इनर इंजिनिअरिंग : शांती शोधत असाल, तर तुम्ही कधीच शांत होणार नाही!

शांती अनेक मार्गांनी मिळवता येते. असं समजा, की भरपेट खाऊन तुम्ही आडवे झालेले आहात, बघा तुम्ही किती शांत असता. दुसरा एखादा मद्य घेईल आणि खूप शांत होईल.
Relax
RelaxSakal
Summary

शांती अनेक मार्गांनी मिळवता येते. असं समजा, की भरपेट खाऊन तुम्ही आडवे झालेले आहात, बघा तुम्ही किती शांत असता. दुसरा एखादा मद्य घेईल आणि खूप शांत होईल.

शांती अनेक मार्गांनी मिळवता येते. असं समजा, की भरपेट खाऊन तुम्ही आडवे झालेले आहात, बघा तुम्ही किती शांत असता. दुसरा एखादा मद्य घेईल आणि खूप शांत होईल. ज्यावेळी तुमचा अहंकार सुखावतो त्यावेळी तुम्ही खूप शांत असता. तुम्ही जिथं जिथं जाता, तिथली माणसं तुमचं समर्थन करण्यास आणि तुमच्या अहंकाराला खतपाणी देण्यास तयार असतील, तर अशा ठिकाणी तुम्ही खूप शांत असता. फक्त अशा जागी, जिथं तुमच्या अहंकाराला ठेच पोचते, तिथं तुम्ही अशांत असता.

साधारणपणे, या जगात माणसं जेव्हा मनाच्या शांतीबद्दल बोलत असतात, तेव्हा ते फक्त त्यांचा अहंकार कसा सुखावेल याविषयी बोलत असतात. अशांत स्थितीत राहण्यापेक्षा आरामशीर राहावं असं त्यांना वाटतं. परंतु, अहंकार सुखावण्यासाठी तुम्ही जी प्रक्रिया अवलंबता तीच प्रक्रिया तुम्हाला अशांतदेखील करते. मनुष्य शांत होण्यासाठी जितके जास्त प्रयत्न करतो, तितका अधिक शांती गमावतो आणि भरकटत जातो. जी व्यक्ती शांत होण्यासाठी प्रयत्न करते आहे ती खरेतर कधीच शांत होऊ शकणार नाही. अगदी याच्या उलट घडेल.

साधारणपणे, तुम्ही शांती मिळवता म्हणजे फक्त स्वतःला आरामदायी बनवता. जेव्हा तुम्ही पर्वताकडे बघता, तेव्हा तुम्ही शांत असता; पण जंगलातून अचानक एखादा हत्ती तुमच्या दिशेने धावत आला, तर तुमची सर्व शांती गायब होते. या शांतीला फारसा अर्थ नाही. यापेक्षा अशांत राहिलेले बरं, कारण तुम्ही अशांत असाल, तर निदान तुम्ही शोध तरी घ्याल. पण शांतीविषयीची चुकीची समजूत तुम्हाला फक्त आत्मसंतुष्ट बनवते. अशांतता तुमचा शत्रू नाही. तुमची आत्मसंतुष्टता तुमचा सर्वांत मोठा शत्रू आहे.

काही साध्य केलं, तरीसुद्धा त्यातून शांती मिळते. जेव्हा तुम्ही काही साध्य केलेलं असतं, तेव्हा तुम्हाला खूप समाधानी वाटतं. तुम्हाला सर्वस्व मिळाल्यासारखं वाटतं. हेसुद्धा थोडा काळच टिकतं. ही पूर्णत्वाची भावना म्हणजे खरं पूर्णत्व नाही. जेव्हा तुमच्या इच्छा किंवा आकांक्षा पूर्ण होतात, किंवा सर्व काही ठीक चालू असतं, तुमच्या अवतीभोवतीची परिस्थिती, तुमचे शरीर आणि तुमचा अहंकार, दोन्हीसाठी सुखावह असते, अशावेळी तुम्ही शांती अनुभवता. पण ही शांती, खरी शांती नाही.

शांती म्हणजे शून्यत्व. शांती तुम्ही निर्माण करू शकत नाही; शांती म्हणजे कुठली घडून येणारी गोष्ट नाही. शांती म्हणजे ज्याचं अस्तित्व सतत आहे. पृष्टभागावर जे घडतं असतं, ती अशांतता असते. हे अगदी एखाद्या महासागरासारखं आहे. महासागराच्या पृष्ठभागावर तुम्ही लाटा बघता, प्रचंड खळबळ आणि कल्लोळ चाललेला असतो; परंतु तुम्ही खोलवर गेलात, तर तिथं पूर्ण शांती असते. शांती, हा अस्तित्वाचा मूळ स्वभाव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com