इनर इंजिनिअरिंग : वेदनांचे दुःख भोगण्याची गरज नाही

दुःख नावाची कुठलीही गोष्ट नाही या अस्तित्वात. दुःख हे नेहमी स्वनिर्मित असते. लोक दुःख भोगण्याचे केवळ दोन मार्ग आहेत.
Sadguru
Sadgurusakal
Summary

दुःख नावाची कुठलीही गोष्ट नाही या अस्तित्वात. दुःख हे नेहमी स्वनिर्मित असते. लोक दुःख भोगण्याचे केवळ दोन मार्ग आहेत.

दुःख नावाची कुठलीही गोष्ट नाही या अस्तित्वात. दुःख हे नेहमी स्वनिर्मित असते. लोक दुःख भोगण्याचे केवळ दोन मार्ग आहेत. साधारणपणे लोक शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख असा विचार करत असतात. खरेतर शारीरिक दुःख असे काहीच नसते. शारीरिक वेदना असतात, दुःख हे मानसिक असते.

वेदना ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वेदनेमध्ये काहीही चूक नाही, वेदना तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि तुमच्यासाठी खूप चांगली आहे. शरीरात जिथे कुठे वेदना नाही, जरा पाहा त्या भागांना तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये कापले आहे. समजा तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये वेदना नसती, तर तुम्ही फॅशनच्या नावाखाली स्वतःच्या चिंधड्या केल्या असत्या. तुम्ही रस्त्यावरून चालताना एखादी कार आल्यास तुम्ही बाजूला सरकता, ते तुमच्यामधल्या नम्रतेमुळे नाही – तर तुम्हाला परिणामी वेदनेची जाणीव आहे म्हणून. काहीच वेदना नसल्यास तुम्ही टिकलाच नसता, कारण अजूनही स्वतःला जपण्याची तेवढी साधी बुद्धिमत्ता तुमच्यात बहरली नाही. केवळ वेदना नको म्हणून तुम्ही स्वतःला जपत आहात.

शरीरामध्ये वेदना आहे, पण दुःख हे नेहमी तुम्ही निर्माण करता. ती एक मानसिक अवस्था आहे. तुम्ही का तुमच्या स्वतःच्या मनामध्ये दुःख निर्माण कराल? केवळ यामुळे, की तुमच्याकडची दोन मूलभूत साधने, जसे की तुमचे शरीर आणि तुमचे मन, ते तुमच्याकडून सूचना घेत नाहीत. तुम्हाला तुमचे मन इथे जायला हवे आहे, पण ते तिथे जाते. तुम्हाला ते तिथे जायला हवे आहे, पण ते भलतीकडेच कुठेतरी जाते. अशा प्रकारचे मन घेऊन तुम्ही कुठे जायचा प्रयत्न करत आहात? तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठे पोहोचला असाल, तर याला एक अपघाताच म्हणायला हवा. समजा तुम्ही ड्राईव्ह करत आहात, जर तुमची कार तुमच्या नियंत्रणाबाहेर गेली, तर तिच्यासोबत तुम्ही सर्वांत पहिली गोष्ट कोणती केली पाहिजे? त्या क्षणी तुमच्या मनात एकच गोष्ट असेल, ती म्हणजे कसे तरी करून कार थांबवायची. नेमकी हीच गोष्ट तुम्ही तुमच्या मानासोबत करायला नको का? तुम्ही तुमची कार दिवसातले फक्त काही तास वापरता.

पण तुमच्या आयुष्याचा प्रवास करण्यासाठी तुमच्याकडचे सततचे वाहन म्हणजे तुमचे मन. जर तेच नियंत्रणाबाहेर गेले आहे; ते तुम्हाला जे हवे आहे, ते करत नाही. तुम्हाला आनंदी राहायचे आहे, पण तुमचे मन दुःख निर्माण करते! अशी परिस्थिती असेल, तेव्हा आपण आपल्याला आत काय चालू आहे, आपल्या आतले वातावरण कसे असले पाहिजे, याकडे थोडे लक्ष देण्याची ही वेळ नाही का? आपण बाहेरची परिस्थिती सुनिश्चित करण्यात प्रचंड वेळ आणि प्रयत्न खर्च करतो. आत्ता सध्या, तुमच्या आयुष्याचा संपूर्ण अनुभव, तुमच्या आयुष्याची गुणवत्ता, ही तुम्ही कुठले कपडे घातले आहेत, कुठल्या प्रकारची कार बाहेर पार्क केली आहे या कुठल्याच गोष्टीवरून ठरत नाही. या क्षणी तुम्ही तुमच्या आत किती शांत आणि किती आनंदी आहात, यावरूनच तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. मग तुम्ही तुमची आंतरिकता ठीक करण्यासाठी थोडा तरी वेळ आणि लक्ष गुंतवायला नको का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com