हेल्दी फूड : कोरोना संसर्गातून बरे होताना...

आपल्या सर्वांना माहिती आहेच, की तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उच्च दर्जाची पोषणमूल्ये आवश्यक असतात.
Food
FoodSakal

आपल्या सर्वांना माहिती आहेच, की तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उच्च दर्जाची पोषणमूल्ये आवश्यक असतात. विशेषतः, कोरोनाच्या संसर्गामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीवर मोठा आघात झाल्यावर व त्यामुळे ती खूपच कमजोर झालेली असताना पोषणमूल्ये खूपच महत्त्वाची ठरतात. असे अनेक पदार्थ आहेत, जे तुमच्या आजारातून बरे होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करतात. कोरोनाचा विषाणू तुमच्या प्रतिकार शक्तीवर मोठा आघात करीत असल्याने तुमच्या या शक्तीचा प्रतिसाद वाढविण्यासाठी हेल्दी फूड आवश्यक ठरते. कोरोनापश्चात आहार कसा असावा यासाठीच्या काही टिप्स...

प्रोटिन्स

प्रोटिन्स तुमच्या जीवनाचे आधारस्तंभ (बिल्डिंग ब्लॉक्स) आहेत व ते आजारातून बरे होण्यासाठी खूप कामी येतात. शरीरासाठी आवश्यक अमिनो अॅसिड तुमचे धोकादायक विषाणूंपासून रक्षण करतात.

फळे आणि भाज्या

नैसर्गिक व ताजी फळे व भाज्या तुमच्या पोषणमूल्यांचा खूपच मोठा स्रोत ठरतात. यातील फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व अॅन्टिऑक्सिडन्टस यांची त्यात मोठी भूमिका असते. यांतून तुमची प्रतिकारशक्ती विकसित होण्यात व ती वाढण्यात मदत होते, तसेच त्यातून तुमची संसर्गाविरोधात लढण्याची ताकदही वाढते.

ऊर्जावर्धक पेये

नारळाचे पाणी तुमचा सर्वांत चांगला मित्र आहे! ते तुमच्या रक्तात पोषणमूल्ये नेते, शरीराचे तापमान नियंत्रित करते व शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर फेकण्यास मदत करते. पाणी. पाणी तुम्हाला आजारातून बरे करण्यास मदत करते. शरीरात सतत पुरसे पाणी असणे अत्यावश्यक आहे. दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. कोणत्याही संसर्गानंतर तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते, तेव्हा तब्येत सुधारत असताना शरीरात विपुल प्रमाणात पाणी जाणे खूप महत्त्वाचे आहे.

उपयुक्त मेद (फॅट्स)

असंत्रृप्त (अनसॅट्युरेटेड) फॅटी अॅसिड्स, जसे की शेंगदाणे, ऑलिव्ह, सनफ्लॉवर, सोया, जेंगली, करडई (कॅनोला) व मका यांच्या तेलांचा आहारात समावेश करा. संत्रृप्त फॅट्स, जसे मेदयुक्त मांस, प्रक्रिया केलेले मांस, बटर, क्रीम, चीज, आणि तूप यांचा आहारात समावेश करू नका.

साखर आणि मीठ सांभाळूनच

आहारात दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा कमी मिठाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. या काळात साखरेचा समावेश असलेले पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा.

या टिप्समधून कोरोना संसर्गातून बरे होताना तुम्हाला चांगली मदत होईल, हीच अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com