तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होतेय का? जाणून घ्या काय आहेत लक्षणं

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोरोना झाला तरी तो लवकर बरा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे हेदेखील आपल्याला समजलं पाहिजे. 

भारतात कोरोनाची साथ आज कहर माजवत आहे. दिवसाला जवळपास 70 हजार रुग्ण वाढत आहेत. आताच्या काळात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहील. याकाळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोरोना झाला तरी तो लवकर बरा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे हेदेखील आपल्याला समजलं पाहिजे. यासाठीच खाली दिलेली काही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

कमी प्रतिकारशक्ती असण्याची काही  लक्षणे-

1. एलर्जी होणे-
आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास, आपली प्रतिकारशक्ती  कमकुवत असल्याचं एक लक्षण आहे.  बरेच लोक एलर्जीमुळे त्रस्त असतात, पण बरेच जण  याकडे दुर्लक्ष करतात. बऱ्याचदा याचे कारण आपल्याला वेगळे भासते, पण याचं कारण  रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने होत असेल असं कुणालाच सुरुवातीला वाटत नाही. जर तुम्ही देखील कोणत्याही प्रकारच्या एलर्जीमुळे ग्रस्त असाल तर, तुम्ही पहिल्यांदा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

2. नेहमी थकवा जाणवणे
तुम्हाला जर जास्त काम न करता सतत थकल्यासारखे आणि सुस्त वाटत असेल तर ते कमी प्रतिकारशक्ती असल्याचं एक लक्षण असू शकतं. जर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास, कठोर परिश्रम केल्यावरच तुम्हाला थकल्यासारखं जाणवेल.  जर तुम्ही काहीही  न करता तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

वाचा - लॉकडाऊन काळात वाढले वजन ! मग हे करा

3. सारखं-सारखं आजारी पडत असाल तर
कमी प्रतिकारशक्तीचं हे एक सामान्य लक्षण आहे. जर आपण वारंवार आजारी पडत असाल तर आपण समजून घ्यावे की आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. वारंवार सर्दी किंवा थंडी ही कमी प्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकतात. अशा परिस्थितीत आपण  निरोगी राहण्यासाठी पौष्टीक पदार्थ आणि व्हिटॅमिन सी खाण्यावर भर दिला पाहिजे.

4. पोटाची समस्या जाणवत असेल तर
बरेच लोक बद्धकोष्ठता, एसिडिटी, पोट फुगणे आणि पोटाच्या इतर समस्यांनी त्रस्त असतात.  जर आपल्याला या समस्या जाणवत असतील तर  समजून घ्या की आपली रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. जरी  पोटाच्या समस्या आपण औषधे घेऊन बरे करू शकता किंवा काही घरगुती उपचारांचा प्रयत्न करू शकत असाल, परंतु आपल्याला या स्थितीत आपली रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्याची देखील आवश्यकता आहे.  

वाचा - जमिनीवर बसण्याचे फायदे; अनेक समस्यांपासून होईल सुटका

5. जखमा भरून येण्यास उशीर होत असेल तर
आपल्या जखमा किती दिवसात बऱ्या होतात याकडे आपण बर्‍याचदा लक्ष देत नाही, परंतु उशीरा जखम भरणे हे देखील एक रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याचं लक्षण असू शकते.  आपल्याला बर्‍याचदा दुखापती होतात, जरी ती अगदी लहान स्क्रॅच असली तरीही, जर बरे होण्यास वेळ लागत असेल तर आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी, तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

(वरील लेखामध्ये देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत तज्ज्ञांशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: signs your immunity is low know all details

Tags
टॉपिकस
Topic Tags: