esakal | लॉकडाऊन काळात वाढले वजन ! मग हे करा.
sakal

बोलून बातमी शोधा

वजन.jpg

लॉकडाऊनमध्ये अनेकांना आहार व व्यायामाकडे लक्ष देता आले नाही; परिणामी अनेकांचे वजन वाढले. लॉकडाऊन काळात व त्यानंतर वजन व इतर आरोग्याच्या समस्यांच्या उपायांसाठी रुग्णांची मोठी संख्या दिसुन आली.

लॉकडाऊन काळात वाढले वजन ! मग हे करा.

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाने मानवी जीवनावर मर्यादा आल्या. समुहापासुन दुर व घरातच बसण्याची वेळ माणसांवर येऊन ठेपली. लॉकडाऊनमध्ये अनेकांना इच्छा असुनही व्यायाम व मॉर्निंग वॉकही करता आले नाही. उलटपक्षी तेलकट व विविध खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची स्पर्धाच सुरु झाली. त्यातच व्यायामाअभावी अनेकांचे वजन वाढले व व्याधींचाही काहींना सामना करावा लागला ही स्थिती याच काळातील आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! 
याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व राठोड आयुर्वेदीक व पंचकर्म सेंटर येथील डॉ. संतोष राठोड यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये अनेकांना आहार व व्यायामाकडे लक्ष देता आले नाही; परिणामी अनेकांचे वजन वाढले. लॉकडाऊन काळात व त्यानंतर वजन व इतर आरोग्याच्या समस्यांच्या उपायांसाठी रुग्णांची मोठी संख्या दिसुन आली. खाद्य पदार्थांवर अनेकांनी ऐतेच्छ ताव मारला. फिरण्यावर व व्यायामावर नियंत्रण होते. पण खाण्यावर नियंत्रण दिसून आले नाही. विशेषतः या काळात फारसे कामच नसल्याने व नोकरदारांना घरीच काम करण्याची मुभा दिल्याने वजन वाढल्याचेही तसेच पचनक्रिया बिघडण्याच्या समस्यांत वाढ दिसून आली. या समस्यांवर औषधीविना आपण उपाय करू शकतो. त्यासाठी जीवनशैली व संतुलित आहाराची गरज आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हे करा 
-नियमीत पायी चाला. 
-पोट नेहमी साफ राहील याची काळजी घ्या. 
-आहारात हिरव्या पालेभाज्यांचा वापर करा. 
-कोमट पाणी प्यावे, वजन कमी होण्यास मदत होते. 
-हा फार्म्युला केला तर महिण्यात तीन किलो वजन कमी होते. 
-ही चार ते पाच पथ्थ्य पाळल्यास शरीरातील कोलेस्ट्राल कमी होते. 


देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हे करु नका... 
-जेवनानंतर लगेच झोपु नका. 
-दिवसा झोपु नकाच. झोपल्यावर कॅलरीज वाढतात. 
-चरबी वाढण्यास दिवसाची झोप कारणीभूत. 
-जेवनानंतर रात्री किमान दीड तासानंतर झोपावे. 
-रात्री सात ते आठ या वेळेत जेवणे उत्तम. 
-रात्री दहाला झोपावे व सुर्योदयापुर्वी उठावे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही महत्वाचे 
-ज्यांचे जन्मतःच वजन वाढलेले आहे. अशांना वजन नियंत्रणात आणण्यास वेळ लागतो. 
-महिलांचे वजन साठच्या वर असेल तर मासीक पाळीत अनियमितता येते. 
-शिवाय गर्भधारणेला अडचणी येऊ शकतात. 
-वजन वाढीमुळे थॉयराईड, उच्चरक्तदाब व मधुमेहाला निमंत्रण. 
-क्रयशक्ती कमी होते, गुढघेदूखीची समस्या निर्माण होतात. 

Edit- Pratap Awachar

loading image