esakal | अंगठ्याची ही साधी टेस्ट ओळखू शकते हृदयविकाराचा संभाव्य धोका
sakal

बोलून बातमी शोधा

अंगठ्याची ही साधी टेस्ट ओळखू शकते हृदयविकाराचा संभाव्य धोका

अंगठ्याची ही साधी टेस्ट ओळखू शकते हृदयविकाराचा संभाव्य धोका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तुम्हाला हृदयविकाराचा धोका आहे का? हे कसं ओळखू शकाल? यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये. तुम्ही घरबसल्या अगदी आरामात हे जाणून घेऊ शकता की तुम्हाला असा काही धोका आहे अथवा नाहीये. तुम्ही म्हणाल हे कसं शक्यय? पण हो, एका साध्या थंब टेस्टने म्हणजेच अंगठ्याच्या चाचणीच्या सहाय्याने तुम्हाला हृदयविकाराच्या प्राणघातक समस्येचा धोका आहे का? हे समजू शकतं.

फक्त आपला अंगठा दुमडून एका साध्या निरिक्षणाद्वारे आपल्याला लपलेली महाधमनी रक्तवाहिनी शोधता येऊ शकते. ही चाचणी करण्यासाठी तुम्ही सहजगत्या करू शकता अशा तीन सोप्या पायऱ्या आहेत - अगदी खाली दाखवल्याप्रमाणे...

हेही वाचा: मधुमेहाच्या रुग्णांनो 'या' चुका टाळा आणि टेन्शन फ्री रहा

abdominal aortic aneurysm (AAA) या महाधमनीमध्ये फुगवटा किंवा सूज आहे, मुख्य रक्तवाहिनी जी हृदयापासून छाती आणि पोटातून खाली जाते.

abdominal aortic aneurysm (AAA) या महाधमनीमध्ये फुगवटा किंवा सूज आहे, मुख्य रक्तवाहिनी जी हृदयापासून छाती आणि पोटातून खाली जाते.

हृदयाशी आणि पोटाशी जोडलेल्या अवयवाच्या भिंतीमध्ये हा फुगवटा आहे. सामान्यपणे असा फुगवटा जरी आरोग्यासाठी गंभीर धोकादायक नसला तरीही ही सूज लवकर सापडली नाही तर ती जीवघेणी ठरू शकते, हे नक्की! महाधमनी रक्तवाहिनीची सामान्यत: कोणतीही लक्षणे दिसत नाहीत मात्र, स्क्रीनिंगद्वारे ती सापडली जाऊ शकते.

मात्र तोपर्यंत, कदाचित खूप उशीर झालेला असू शकतो आणि हा फुगवटा इतका मोठा होऊ शकतो की तो फुटण्याच्या पातळीवर आलेला असू शकतो. जर का हा फुगवटा फुटला तर अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूदेखील होऊ शकतो. अशाप्रकारे फुगवटा फुटलेल्या 10 पैकी जवळपास 8 लोक हे रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मरतात किंवा त्यांची शस्त्रक्रियेपा जरी केली तरी ते वाचण्याची शक्यता उरत नाही. परंतु येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉक्टर सांगतात त्यानुसार, लोक विश्वसनीय चाचणीद्वारे स्वतःला हा धोका आहे का हे तपासू शकतात.

हेही वाचा: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या आवश्यकता नाही - Lancet Report

अशा करा चाचणी

  • “thumb palm test" करण्यासाठी, एका हाताचा तळहात सपाट ठेवा.

  • तळहातावर शक्य तितक्या लांब अंगठा न्या.

  • जर तुमचा अंगठा तुमच्या सपाट तळहाताच्या पलीकडे ओलांडून जात असेल तर कदाचित रोगामुळे लाल रक्तवाहिनीची अवाजवी वाढ होऊ शकते.

  • अशा प्रकारे अंगठा हलवता येणं हे एखाद्या व्यक्तीचे सांधे ढिले असल्याचे अप्रत्यक्ष संकेत आहे.

  • संपूर्ण शरीरात जोडणाऱ्या ऊतक रोगाची ही संभाव्य चिन्हे आहेत. यात महाधमनीचाही समावेश असू शकतो. कारण शरीरातील सर्वात मोठी धमनी ही हृदयातून आणि पोटातून जाते. संशोधकांनी 305 लोकांवर या पद्धतीची चाचणी केली आणि त्यांचे निष्कर्ष अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित केले. परंतु ज्या रुग्णांची चाचणी सकारात्मक आहे त्यांना एन्यूरिझम असण्याची उच्च शक्यता असते, असं डॉ एलेफर्टिएड्स म्हणाले.

loading image
go to top