esakal | मधुमेहाच्या रुग्णांनो 'या' चुका टाळा आणि टेन्शन फ्री रहा
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes

ब्लड शुगरची पातळी नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर नेहमीच उत्तम आहार, व्यायाम, पुरेशा झोपेचा सल्ला देतात.

मधुमेहाच्या रुग्णांनो 'या' चुका टाळा आणि टेन्शन फ्री रहा

sakal_logo
By
स्नेहल कदम

डायबिटीजमुळे बरेचजण त्रस्त असतात. शरीरातील याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रत्येकजण बरेच उपाय अजमावत असतात. ब्लड शुगरची पातळी नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर नेहमीच उत्तम आहार, व्यायाम, पुरेशा झोपेचा सल्ला देतात. शिवाय तणावमुक्त राहण्याचा सल्लाही देतात. काही तज्ज्ञांना डायबिटीज पेशंटना या काही महत्वाच्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला आहे. या काही गोष्टी पुढीलप्रमाणे...

फळे खाण्याचे प्रमाण -

डायबिटीजच्या आजराने त्रस्त असणाऱ्या लोकांना फळे खाल्ल्याने डायबिटीजचा त्रास अधिक उद्भवतो असे वाटते. परंतु असे नसून फळे कोणती खावीत आणि कधी खावीत याचा योग्य मेळ साधल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. कोणती फळे अधिक खावीत आणि कोणती फळे कमी खावीत यावर लक्ष केंद्रीत करावे लागते.

हेही वाचा: Health Tips: एक ग्लास वेलचीचं पाणी प्याल, निरोगी राहाल...

अपुरी झोप -

रोजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हल्ली आपण सर्वजण व्यायाम, योगा करण्याकडे आळस आणि दुर्लक्ष करतो. परंतु याचा प्रभाव कळत नकळत आपल्या हार्मोन्सवर होत असतो. झोपल्यामुळे हे हार्मोन्स संतुलित होतात आणि दुसऱ्या दिवसासाठी शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे काम करते. हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. अशा काही महत्वाच्या नियमांचे पालन केल्यास तुम्ही डायबिटीजवर नियंत्रण मिळवू शकता.

ताणतणाव -

हल्ली कामामुळे आपण दिवसभर धावपळ करत असतो. यावेळी अनेकवेळा तणावाच्या वातावरणात कामही करावे लागते. हा तणाव शरीरावर नकरात्मक परिणाम करतो. यामध्ये जर डायबिटीज पेशंट तणावाखाली काम करत असेल तर त्याच्या रक्त शर्करांचा स्तर प्रभावित होतो. यामुळे पेशंटच्या हृदयावरही परिणाम होण्याची शक्यता असते.

हेही वाचा: हृदयाची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या...

खाण्यापिण्याच्या वेळेत बदल -

जर तुम्ही डायबेटिजनी त्रस्त असाल आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळेत बदल होत असतील तर ते शरीरासाठी हानिकारक आहे. जर खाण्याच्या वेळेत तुम्ही अधिक गॅप ठेवत असाल तर याचा शरीरावर परिणाम होतो. यामुळे रक्त शर्करांचा स्तर प्रभावित होतो. यावर आहारतज्ज्ञ जेवणाच्या वेळेबाबत सल्ला देतात. शिवाय आहाराचे लहान लहान भागात वर्गीकरण करण्यास सांगितले जाते. यावेळी तुम्ही काही आहारात किंवा स्नॅकमध्ये काही हेल्दी पदार्थांचा वापर करु शकता.

तज्ज्ञांचा सल्ला -

डायबेटिजचा आजाराने त्रस्त असणाऱ्या अनेकांना आहारतज्ज्ञ वेळेवर खाण्यापिण्याचा सल्ला देतात. या आजाराला नियंत्रणात ठेवायचे असल्यास काही औषधी वनस्पतींचा वापर करण्याचा सल्लाही दिला जातो. यामध्ये दालचिनी, हळद, कढीपत्ता, कोरफड, मेथी या काही घटकांचा उपयोग करु शकता.

हेही वाचा: करा सात्त्विक ताकाचो सेवन; मिळेल रोगांपासून आराम

loading image
go to top