दिवसा झोपल्याने काय होतं? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या| Moring Sleep | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

morning
दिवसा झोपल्याने काय होतं? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या| Moring Sleep

दिवसा झोपल्याने काय होतं? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या

प्रत्येक व्यक्तीला ७ ते ८ तासांची रात्रीची झोप मिळणे गरजेचे असते. पण काहीवेळा एवढी झोप (Sleep) मिळाली नाही तर माणसाला दिवसभर थकल्यासारखे वाटते. अशावेळी मग दिवसभर वेळ मिळेल तेव्हा डुलकी घेतली जाते. पण हे तुमच्या तब्येतीसाठी (Health) फायदेशीर आहे का ते पाहणेही गरजेचे आहे. आयुर्वेदात( Ayurved) दिवसा झोपल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते सांगितले आहे.

हेही वाचा: पालकांनो, मुलांना झोपेची शिस्त लावा! वाचा अभ्यास काय सांगतो

आयुर्वेद काय सांगतो?

दिवसा झोपणे हे आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्य मानलं जात नाही. यामुळे कफ- पित्तावर परिणाम होऊन असंतुलन निर्माण होतात. त्यामुळे ज्या लोकांना कफ- पित्ताचा त्रास आहे त्यांनी दुपारी झोपू नये. मात्र निरोगी लोक अपवादात्मक परिस्थितीत दिवसा झोपू शकतात. तसेच ज्यांना मधुमेह आहे. जे लठ्ठपणामुळे ग्रस्त आहेत त्यांनीही दिवसा झोपू नये. कारण यामुळे त्यांचे वजन आणखी वाढण्याचा धोका असतो. तसेच स्मरणशक्तीवर परिणाम होऊन रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.

हेही वाचा: 'हे' तीन पदार्थ खा; घोरण्याच्या आजाराचा त्रास कमी करा!

sleep

sleep

दुपारची झोप घ्यावी का?

- दिवसा झोपेची सवय अनेकांना त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे रात्री चांगली झोप लागत नाही. तसेच आळशीपणा वाढू शकतो. दुपारी एक तासापेक्षा जास्त वेळ झोपल्यानं शरीर सुस्त होण्याचा धोका असतो. पण दिवसा झोपण्यापेक्षा दुपारची १५ -२० मिनीटांची झोप शरीरासाठी फायद्याची मानली जाते. त्यापेक्षा जास्त झोपल्यास शरीरात आळस आणखी वाढू शकतो. त्यामुळे दुपारी झोपताना अलार्म सेट करून झोपणे जास्त चांगले.

हेही वाचा: Summer Tips: उन्हाळा आलाय, या पाच गोष्टींची काळजी घ्या

Web Title: Sleeping During The Day Good Or Bad For Health Ayurved Tips For Good Sleep

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..