
अंतर्मनातील सुसंवाद व खोली शोधून ती मंत्राच्या साहाय्याने तुम्ही चेतनेच्या खोल पातळीपर्यंत पोहोचू शकता आणि दैनंदिन जीवनात त्याची अनुभूती मिळवू शकता. हेसुद्धा एक प्रकारचे ध्यानच आहे.
शरीराच्या मागे मन धावत जाते की मनाच्या मागे शरीर, हे तुम्ही सांगू शकत नाही. मात्र, सुदर्शन क्रियेमध्ये शरीर, श्वास आणि मन, यात लयबद्धता साधली जाते, हे नक्की. अंतर्मनातील सुसंवाद व खोली शोधून ती मंत्राच्या साहाय्याने तुम्ही चेतनेच्या खोल पातळीपर्यंत पोहोचू शकता आणि दैनंदिन जीवनात त्याची अनुभूती मिळवू शकता. हेसुद्धा एक प्रकारचे ध्यानच आहे.
हेही वाचा : भावनांवर आवर घालायला शिका!
तुम्ही पूर्ण समाधानी असता आणि वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या गरजांमुळे त्रस्त नसता, त्या वेळेस निखळ आनंद मिळविण्याची क्षमता तुमच्यात येते. नेहमी समाधानी राहण्याची कला आत्मसात करता यावी. हे फक्त ध्यानधारणेमुळेच साध्य होते. काही काम न करता नुसते आळशीपणाने बसण्याला समाधानी वृत्ती म्हणत नाहीत किंवा समाधानी वृत्ती अंगी बाळगण्यासाठी वयस्कर होण्याची वाट बघावी लागत नाही. मनातच समाधानाची लाट उसळून यायला हवी. तुमचे काम तुम्ही करत राहा; पण मनात समाधानी वृत्ती जोपासा. ‘मी पूर्ण समाधानी आहे,’ या स्थितीला आयुष्यात तुम्ही पोचायला पाहिजे. पूर्ण समाधानी झाल्याशिवाय आशीर्वाद देण्याची ताकद तुमच्यात येत नाही. साधना, सेवा आणि सत्संग करा आणि जीवन खऱ्या अर्थाने जगा, आयुष्याचा आनंद उपभोगा. स्वत: आनंदी रहा आणि इतरांना आनंदी करा.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पौराणिक ग्रंथ आणि तीन तत्त्वज्ञान
१) न्याय
२) वैशेषिक
३) सांख्य
यानंतर योग येतो.
न्याय : आपण शिकतो,. ते समजून घेतो, त्याचे पृथक्करण करतो आणि ते बरोबर असल्याचे पडताळून पाहतो. आपण ऐकतो आणि तर्काने अनुमान लावतो, या दोन्हीतल्या फरकाचे विश्लेषण करण्याला न्याय म्हणतात. सत्य शोधून काढण्याचा हा एक प्रकार आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वैशेषिक : या पद्धतीमध्ये वस्तू आणि त्याच्या गुणधर्मांचे विश्लेषण केले जाते. प्रत्येक वस्तूला त्याचे गुणधर्म असतात. याप्रमाणेच ठिकाण आणि वेळ-काळ यांनाही गुणधर्म असतात, म्हणून त्यांना वस्तू समजतात. वेळ-काळाचा परिणाम मनावर आणि बुद्धीवर होतो. मनाची आकलन शक्ती आणि अनुभूती घेण्याची ताकद सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळी असते. आकाशतल्या ग्रहताऱ्यांचा प्रभावसुद्धा मनावर होत असतो. निरनिराळ्या भावना मनात उभारून येणे हे स्वाभाविक आहे, पण ‘मी’ या सर्वांपासून वेगळा आहे. मी ‘आत्मा’ आहे, असे मनन आणि चिंतन करणे हे बुद्धीचे द्योतक आहे.
सांख्य : वस्तू बदलत असतात हे लक्षात आल्यावर तुमचे मन कधीही न बदलणाऱ्या गोष्टीवर एकाग्र करा. असे करण्यालाच ‘सांख्य योग’ म्हणतात.