चेतना तरंग : घटनांना सामोरे जाऊन मात करा!

आपल्या जीवनात ज्या समस्या येतात त्या सर्व, आपण घटनांना अतिमहत्त्व देत असल्यामुळे उद्‌भवतात. असे केल्यामुळे घटना आपल्यापेक्षा मोठ्या, महत्त्वाच्या होऊन राहतात.
Sri Sri Ravi Shankar
Sri Sri Ravi Shankarsakal
Summary

आपल्या जीवनात ज्या समस्या येतात त्या सर्व, आपण घटनांना अतिमहत्त्व देत असल्यामुळे उद्‌भवतात. असे केल्यामुळे घटना आपल्यापेक्षा मोठ्या, महत्त्वाच्या होऊन राहतात.

आपल्या जीवनात ज्या समस्या येतात त्या सर्व, आपण घटनांना अतिमहत्त्व देत असल्यामुळे उद्‌भवतात. असे केल्यामुळे घटना आपल्यापेक्षा मोठ्या, महत्त्वाच्या होऊन राहतात.

समजा, एका वर्दळीच्या रस्त्यावर तुम्ही मोटारसायकलवरून जात आहात. तुमच्या समोरील वाहन खूप अधिक त्रासदायक धूर सोडत आहे. अशावेळी तीनपैकी एक कृती करता येईल...

1) तुम्ही तक्रार कराल. पण मग सहन करीत राहाल. त्या वाहनाच्या मागून जात राहाल.

2) तुम्ही तुमचा वेग काही काळ कमी करून त्या पुढच्या वाहनाला तुमच्यापासून दूर जाऊ द्याल.

3) कुशलतेने तुम्ही त्या पुढील वाहनाला ओलांडून पुढे जाल आणि मग त्या वाहनाला विसरून पुढे निघाल.

पहिल्या कृतीप्रमाणे आपण बहुतेक जण घटनांशी स्वतःला जखडून राहतो आणि दुःखी-कष्टी होत असतो. जसे की पूर्ण प्रवासात पुढील वाहनाचा धूर सोसत राहावे.

दुसऱ्या कृतीमध्ये तुम्ही मुक्त व्हाल, पण ते काही काळापुरतेच. कारण मग मागून तुमच्यापुढे आणखी मोठे वाहन येऊन धूर ओकू लागेल, हे शक्य आहे. घटनांपासून दूर पळून जाणे हा कायमस्वरूपी उपाय नसतो.

शहाणे, ज्ञानी लोक आपले सर्व कौशल्य वापरून त्या घटनेवर मात करतील आणि तिच्या पलीकडे निघून जातील. तुमची स्वतःची मोटारसायकल सर्व दृष्ट्या व्यवस्थित असेल, तर तुम्ही असे कौशल्य वापरू शकाल.

तुमच्या वाहनाला चांगल्या स्थितीत ठेवणे ही साधना आहे आणि

गुरूची तुमच्यावरील कृपा हे तुमचे कौशल्य बनेल.

तुमच्या भूतकाळात तुम्ही केलेल्या चुकांनी तुम्हाला विनम्र बनवलेले आहेच. आता परत विनम्र बनण्यासाठी पुन्हा चुका करण्याची आवश्यकता राहिली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com