चेतना तरंग : उद्धट वर्तनाचा सामना कसा करावा?

कुणी तुमच्याशी उद्धटपणाने वागले तर तुम्ही काय करता?
Sri Sri Ravi Shankar
Sri Sri Ravi Shankarsakal
Summary

कुणी तुमच्याशी उद्धटपणाने वागले तर तुम्ही काय करता?

कुणी तुमच्याशी उद्धटपणाने वागले तर तुम्ही काय करता?

  • तुम्ही नाराज व्हाल.

  • तुम्ही उद्धटपणे उलट उत्तर द्याल.

  • निराश व्हाल.

  • तिथून पळ काढाल आणि त्या व्यक्तीला अथवा तशा प्रसंगाला टाळाल.

  • त्या व्यक्तीला दोष द्याल.

  • त्या व्यक्तीला उपदेश कराल.

या वरीलपैकी कोणत्याही प्रतिक्रियेमुळे तुम्हाला फायदा होणार नाही. मग अशा वेळी कसे वागावे? काय पर्याय आहेत?

  • उद्धट वर्तनाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहा.

  • उद्धट माणूस त्याच्या विचारांशी किती एकनिष्ठ आहे हे दिसून येते.

  • ती व्यक्ती किती तणावात आणि बोथट संवेदनांसह आहे हे कळते.

  • त्या व्यक्तीवरील संस्कारांचे आपल्याला दर्शन होते.

  • लोकांची वर्तणूक कशी असू शकते हे पाहायला मिळते.

  • त्यांच्या अज्ञानाची कल्पना येते.

  • ते आपल्या मनाचे आणि संवेदनशीलतेचे साक्षीभावाने निरीक्षण करत नसल्याचे जाणवते.

  • कसे वागू नये ते ध्यानात येते.

  • उद्धटपणाला सहजतेने सामोरे जायची आणि त्याला सहज स्वीकारू शकण्याची संधी मिळते.

  • तुम्ही स्वतः बिनशर्त, निरिच्छ प्रेम आहात, याची जाणीव होते.

आता पुढच्या खेपेला जेव्हा कुणी तुमच्याशी उद्धटपणाने वागेल तेव्हा उत्तरादाखल केवळ छानसे हसा. जर, तुम्ही लोकांचा उद्धटपणा पचवू शकाल, तर मग तुम्ही अढळ, अविचल होत जाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com