चेतना तरंग : अभिलाषा आणि विरक्ती!

Sri Sri Ravishankar
Sri Sri Ravishankar

या विश्वाची गुह्यता पवित्रतेत आहे. या पवित्रतेच्या गर्भातच क्रियाशीलतेचा जन्म होतो. चेतना पवित्र असते. निसर्गाचे वर्चस्व मान्य करण्यातच पवित्रता असते. या विश्वाच्या अस्तित्वाची कृतज्ञता मानण्यातच पवित्रता सामवलेली असते. ज्ञानाच्या अगणित कक्षा मान्य करण्यात पवित्रता असते. तुम्ही अस्तित्वात खोलवर सूर मारूच शकणार नाही.

तुम्हाला जी गोष्ट साध्य करायची आहे त्याबद्दल ठाम राहा. कार शर्यतीमध्ये गाड्या रस्त्यावरून वेगाने जात असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला उभे असतात. गाडी जवळ आल्यावर हे लोक त्यांना मोठमोठाने ओरडून प्रोत्साहन देत असतात. लोकांच्या प्रतिसादामुळे आणि प्रोत्साहनामुळे कार चालविणाऱ्या ड्रायव्हर्सच्या मनात उत्साह संचारतो आणि ते अधिक जोमाने शर्यतीत सहभागी होतात. मनाला अशाच प्रोत्साहनाची जरूरी असते. कधी कधी मन कच खाते, अशावेळी मनाला खंबीरपणे आधार देण्याची आवश्यकता असते. वेळ आल्यावर त्याला प्रोत्साहन देण्याची गरज भासते. विशेषतः मनात चलबिचल असताना त्याला हुरूप देण्याची गरज असते. एवढे करूनही मनातली चलबिचल कमी झाली नाही, तर मनालाच नष्ट करावे लागते. असे करणे म्हणजेच स्वीकारलेली गोष्ट खंबीरपणे तडीस नेणे.

तुम्हाला असे वाटेल, की मनच नष्ट झाल्यावर तुम्ही ठामपणे कसे उभे राहू शकाल? पण यातसुद्धा तथ्य आहे. वरवर यात विरोधाभास वाटला, तरी त्यात वास्तवता आहे. मनाचीच दोलायमान वृत्ती याला कारणीभूत असते. मनाला संपूर्णपणे नामशेष करायचे असल्यावर मन त्याला तयार होत नाही, मात्र  अशावेळी तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहिल्यास आपोआपच मनाचे अस्तित्व नष्ट होते.

सूर्याच्या किरणांनी धुके जसे विरून जाते किंवा ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो, त्याप्रमाणे तुमच्या अंतस्थ गाभ्यातून ऊर्जेचा प्रवाह खळखळून वरती आल्यावर सगळे विचार, इकडे तिकडे भरकटणारे मन नष्ट होते आणि तुम्हाला अंतर्मनातून स्फुरलेल्या ऊर्जेची जाणीव होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंद्रियजन्य सुखाच्या अभिलाषेमुळे तुम्ही बंधनात अडकता; आणि त्यांचा त्याग केल्यामुळे त्यातून मुक्त होता. आसक्तीचे बीज उपटून टाका आणि त्या अद्वैताच्या आनंदमयी ब्रह्माच्या बीजाची उपासना करा. इंद्रियजन्य गोष्टींमुळे सुरवातीला तुम्हाला सुख मिळाल्याचा भास निर्माण होतो; त्यामुळे त्या गोष्टींच्या विळख्यात तुम्ही सापडता, त्या गोष्टींविषयी तुमच्या मनात आसक्ती निर्माण होते, पण कालांतराने त्याच गोष्टी तुम्हाला क्लेशदायक वाटू लागतात. इंद्रियजन्य गोष्टींचा हा मूळ स्वभावच असतो. सुरवातीला तुम्हाला सुख मिळवून द्यायचा आभास या गोष्टी निर्माण करतात, एखादवेळेस त्यातून प्रथम तुम्हाला सुख मिळतेही, मात्र नंतर त्यातून दु:ख आणि क्लेशच वाट्याला येतात.

त्यामुळे तुम्ही पेचात सापडता. त्या गोष्टींना तुम्ही धडपणे स्वीकारू शकत नाही किंवा त्यांचा त्यागही करू शकत नाही. या गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे तुमच्या वाट्याला दु:खच येते आणि त्यांचा त्याग करताना सुद्धा दु:ख तुमची पाठ सोडत नाही. इंद्रियजन्य वस्तूंचा हा स्वभाव असतो, या वस्तू तुमच्यावर बंधने टाकतात. ही बंधने म्हणजे तरी काय? तुम्हाला या गोष्टींविषयी वाटणारी आसक्ती किंवा अभिलाषा. सगळ्या आयुष्यभर आपण शिकतच असतो. शेवटी स्वातंत्र्य म्हणजे काय? ‘विरक्ती’. इंद्रियजन्य गोष्टींपासून विरक्ती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com