2050 सालापर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना लागणार चष्मा... जाणून घ्या कारणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eye
2050 सालापर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना लागणार चष्मा... जाणून घ्या कारणं

2050 सालापर्यंत जगातल्या अर्ध्या लोकांना लागणार चष्मा... जाणून घ्या कारणं

फोन आणि इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे असे म्हणतात. एका क्लीकवर तुम्हाल सर्व माहिती अगदी सहज मिळते. त्यामुळे कायम तुमच्या हातात फोन असतो. नाहीतर लॅपटॉप किंवा टॅब्लेटचा वापर तुम्ही ऑफिसच्या कामासाठी, पिच्चर पाहण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी सतत करत असता. पण स्सार्टफोन आणि टॅब्लेटचा सततचा वापर हा तुमच्यासाठी धोकादायक ठरणार आहे. या व्यसनामुळो डोळ्यांवर परिणाम होऊन लोकांना चष्म्याची गरज भासेल, असे संशोधकांचे मत आहेय 2050 पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येला चष्मा लागणार असल्याची बाब नुकत्याच झालेल्या एका संशोधनात समोर आली आहे.

हेही वाचा: मानसिक आरोग्यासाठी का गरजेचं आहे समुपदेशन? जाणून घ्या कारणं

The Lancet Digital Health Journal मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात तीन महिन्याच्या बाळापासून 33 वर्षे वयोगटातल्या तरूण लोकांवर अभ्यास करण्यात आला. संशोधनात सहभागी असलेल्या एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या नेत्रविज्ञान विभागाचे प्रोफेसर रुपर्ट बॉर्न यांनी हा अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, फोन आणि टॅब्लेटच्या अतिवापरामुळे लोकांची दृष्टी कमी होण्याचा धोका तसेच मायोपिया 30 टक्क्यांनी वाढला आहे. तर जे लोक अती प्रमाणात फोन, संगणकाचा वापर करतात त्यांच्यामध्ये हा धोका 80 टक्क्यांनी वाढतो, असेही म्हटले आहे.

हेही वाचा: Winter Care | हिवाळ्यात होणाऱ्या सततच्या सर्दीला औषध काय?

असे आहे संशोधन

The Lancet Digital Health Journal मध्ये प्रकाशित झालेल्या पेपरनुसार संशोधकांनी स्मार्ट डिव्हाईसच्या वापरामुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो हे शोधून काढण्यासाठी तीन हजारपेक्षा जास्त लोकांचा अभ्यास केला. एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या नेत्रविज्ञान विभागाचे प्रोफेसर रुपर्ट बॉर्न यांच्यासह सेंटर फॉर आय रिसर्च ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांचाही संशोधनात सहभाग होता. एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनमुळे जगभरातील लोकांचा स्क्रीनटाईम वाढला आहे. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असून लहान मुलांच्या डोळ्यावर त्याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.सध्या शिक्षणही ऑनलाईन सुरू असल्याने आई-बाबा मुलांना जास्त वेळ ऑनलाइन राहण्याचा आग्रह करतात. संशोधनात मिळालेल्या आकड्यांनुसार युकेमध्ये राहणाऱ्या तीनपैकी एका व्यक्तीवर याचा परिणाम झाला आहे. स्क्रीन टाईम वाढल्याचा सर्वात जास्त परिणाम भारतासह आशियातील लोकांच्या डोळ्यावर सर्वात जास्त होईल. कारण जगातील सर्वात मोठी लोकसंख्या याच देशात राहते. ज्या देशात सर्वात जास्त स्मार्टफोन असतील तेथील लोकांच्या डोळ्यांवर याचा सर्वात जास्त परिणाम होईल.

हेही वाचा: Winter Care: सर्दी खोकला झाल्यामुळे वैतागले आहात? हे सहा उपाय करा

मायोपिया म्हणजे काय?

दूरच्या गोष्टी स्पष्ट दिसण्यास अडचणी आल्यास मायोपिया झाला असे म्हणता येईल. या आजाराविषयी विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास,एखादी वस्तू 2 मीटर किंवा 6.6 फूट अंतरावर असेल ती आपल्याला अस्पष्ट दिसते.

हा आहे उपाय

या आजारात डोळ्यात जाणारा प्रकाश रेटिनावर केंद्रीत होत नाही. त्यामुळे समोरचे चित्र अस्पष्ट दिसते. हा त्रास कमी करण्यासाठी चष्मा, कॉन्टेक लेन्स किंवा अपवर्तक शस्त्रक्रिया करून डोळ्यांची दृष्टी नीट होऊ शकते. तुमच्या डोळ्यांवर मायोपियामुळे किती परिणाम झाला आहे त्याआघारे तुमच्या चष्म्याचा तसेच कॉन्टेक्ट लेंसचा नंबर ठरवता येतो.

loading image
go to top