Oral Hygiene तोंड साफ नसेल तर वाढतो हृदयविकाराचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोंड साफ नसेल तर वाढतो हृदयविकाराचा धोका
Oral Hygiene तोंड साफ नसेल तर वाढतो हृदयविकाराचा धोका

तोंड साफ नसेल तर वाढतो हृदयविकाराचा धोका

आपल्याला लहानपणापासूनच तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी नियमित दात घासणे कसे मह्त्वाचे आहे ते शिकवले जाते. म्हणून तर दिवसातून दोनदा दात घासले जातात. पण 2019 साली झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, दात घासल्याने अॅट्रियल फायब्रिलेशन आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनातून तोंडाची स्वच्छता आणि हृदय यांच्यातील संबंध दाखविण्यात आला आहे. अभ्यासानुसार तोंड अस्वच्छ असेल तर, रक्तात बॅक्टेरिया, कृमी निर्माण होतात. त्यामुळे शरीरात जळजळ होते. हीच जळजळ पुढे अनियमित हृदयाचे ठोके (तांत्रिक भाषेत अॅट्रियल फायब्रिलेशन) आणि हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरते.

हेही वाचा: Sleep Routine : साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर सावधान!

heart

heart

असा केला अभ्यास

कोरियन नॅशनल हेल्थ इन्शुरन्स सिस्टीमशी संबंधित असलेलेल्या 40 ते 79 वयोगटातील 1,61, 286 लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. यात सहभागी झालेल्या लोकांना अनियमित हृदयाचे ठोके किंवा हृदयविकाराचा कोणताही इतिहास नव्हता. तरीही त्यांची 2003 ते 2004 या सालादरम्यान नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात वजन, उंची, प्रयोगशाळा चाचण्या, मौखिक अरोग्य, मौखिक आरोग्यासंबधित वर्तन, आजार आणि त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, याविषयी माहिती गोळा केली गेली. त्यानंतर साधारण 10.5 वर्षांनी फॉलोअप घेतला गेला. त्यात अंदाजे 3.0% सहभागींना अनियमित हृदयाचे ठोके निर्माण झाले. तर 4.9% लोकांना हृदयविकाराचा धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: आरोग्यातही एकमेकांना साथ! नवरा-बायकोने हेल्दी राहण्यासाठी वाचा खास टीप्स

हे आहेत निष्कर्ष

संशोधकांनी नमूद केले की हे निष्कर्ष वय, लिंग, नियमित व्यायाम, मद्यपान, सामाजिक आर्थिक स्थिती, बॉडी मास इंडेक्स आणि कॉमोरबिडी यांच्यापासून स्वतंत्र होते.फॉलोअपमधून केलेल्या अभ्यासात दिवसातून तीन किंवा अधिक वेळा दात घासल्याने अनियमित हृदयाच्या ठोक्यांचा धोका (अॅट्रियल फायब्रिलेशन) 10% नी कमी होतो आणि हृदय विकाराचा धोका 12% नी कमी होतो, असे दिसून आले. हे संशोधन एका देशापुरते मर्यादित होते. सोलच्या इव्हा वुमन्स युनिव्हर्सिटीच्या ज्येष्ठ लेखिका डॉ. ताई जिंन सॉन्ग म्हणाल्या की. खूप लोकांचा अभ्यास दिर्घ कालावधीसाठी केला गेला असल्याने आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष मजबूत आहेत.

हेही वाचा: हिवाळ्यात वजन कमी करायचंय? आहारात हवे हे पाच पदार्थ

brushing

brushing

तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी या आहेत महत्वाच्या गोष्टी

1) दिवसातून दोनदा दात घासावेत

2) मऊ ब्रिस्टल ब्रश वापरा, तो दर 3-4 महिन्यांनी बदला. फ्लोराईड टूथपेस्ट वापरण्याचा सल्ला दंतचिकित्सकांनी दिला आहे.

3) तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी फ्लॉसिंगच्या वापरामुळे मदत होते.

4) ब्रश केल्यानंतर, तोंड स्वच्छ धुण्यासाठी माउथवॉश वापरा. ब्रशिंगनंतरही शिल्लक राहणारे सूक्ष्म जंतू यामुळे निघून जातील.

5) साखरयुक्त अन्न आणि पेये शक्यतो टाळाच.

6) तंबाखू खाणे बंद करा. कारण तोंडाच्या स्वच्छतेवर त्याचा परिणाम होतो.

loading image
go to top