
उसाचा रस प्या, थंडी पळवा!
उसाचा रस न आवडणारी व्यक्ती विरळाच. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे उसाचा रस (Sugarcane juice) प्यायल्याने फायदा होतो, तसाच थंडीतही होतो. उसाचा रस हा नैसर्गिक डिटॉक्स आहे. तो प्यायल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहू शकता. मात्र उसाच्या रसात लिंबू, थोडेसे पुदिना आणि आले आणि चिमूटभर मीठ घालून तो प्यायल्यास अधिक चविष्ट लागेल.
हेही वाचा: व्हायग्राचा वापर कॅंसरच्या उपचारासाठी होणार; संशोधनात केला दावा
हे होतील फायदे (Sugarcane Juice Benefits)
-तुम्ही रोज उसाचा रस प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्तीत वाढ होऊ शकते.
-तुमची हाडे मजबूत करण्यासाठी मदत मिळते.
-तुमचा ताणतणाव कमी करण्याव्यतिरिक्त तुमची पचनसंस्था योग्य नियंत्रणात राहू शकते.
-उसाचा रस हा एनर्जी बूस्टर आहे. त्यामुळे तुमच्यात उत्साह राहतो.
-तुमच्या मूत्रपिंड आणि यकृताला चालना देण्यासाठी आणि यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
-कावीळ झाल्यावर ती लवकर बरी करण्यासाठी उसाच्या रसाचा फायदा होईल.
-ऊस अँटिऑक्सिडंटने समृद्ध नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते. तसेच उच्च फायबर असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
-तुम्ही हायड्रेटेड राहता आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत होते.
-उसाच्या रसात असलेल्या AHA (अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड) मुळे त्वचा तजेलदार होते. तसेच पुरळ मुक्त होण्यास मदत होते.
-उसामध्ये व्हिटॅमिन बी 12 आहे . ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
हेही वाचा: हे पदार्थ टाळल्याने आयुष्य अधिक निरोगी आणि दीर्घ होईल
Web Title: Sugarcane Juice Is An Ideal Winter Drink Know Its Benefits For Health
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..