

World Menstrual Hygiene Day
ESakal
'वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे' निमित्त धारावीत आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत 2000 हून अधिक स्थानिक महिला आणि किशोरवयीन मुलींनी सहभाग नोंदवला. 'नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडक यांच्या वतीने धारावी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती शिबिरात मासिक पाळीतील स्वच्छता, महिला आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि तंदुरुस्तीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा विषयांबाबत जनजागृती करून स्थानिक महिला आणि किशोरवयीन मुलींसोबत मुक्त संवाद साधण्यात आला.