esakal | तुम्हालाही वारंवार उलटी येते? असू शकतो 'हा' गंभीर आजार, वाचा कारण अन् उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

symptoms of cyclic vomiting syndrome nagpur health news

ही समस्या उद्भवते त्यावेळी त्या व्यक्तीला उलटी कशामुळे येत आहे याचे कारण समजत नाही. साधारण लहान मुलांमध्ये ही समस्या पाहायला मिळते. मात्र, आता मोठ्यांमध्ये देखील या समस्येचे प्रमाण वाढले आहे. आज आम्ही या सिंड्रोमबद्दलच तुम्हाला सांगणार आहोत. 

तुम्हालाही वारंवार उलटी येते? असू शकतो 'हा' गंभीर आजार, वाचा कारण अन् उपाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : एखाद्याला उलटी येणे ही काही गंभीर समस्या नाही. मात्र, हे एका गंभीर आजाराचे लक्षणे असू शकतात. मात्र, कोणत्याही कारणाविना तुम्हाला उलटी येत असेल तर काय करायचे? या स्थितीला साइक्लिक वोमिटिंग सिंड्रोम म्हणतात. ही समस्या उद्भवते त्यावेळी त्या व्यक्तीला उलटी कशामुळे येत आहे याचे कारण समजत नाही. साधारण लहान मुलांमध्ये ही समस्या पाहायला मिळते. मात्र, आता मोठ्यांमध्ये देखील या समस्येचे प्रमाण वाढले आहे. आज आम्ही या सिंड्रोमबद्दलच तुम्हाला सांगणार आहोत. 

हेही वाचा - नागपुरातही होती लस संशोधन संस्था; झाली होती देवी, कॉलरा लशींची निर्मिती; केंद्र...

सायक्लिक वोमिटींग सिंड्रोमचे कारण -
आम्ही आधीच सांगितलं आहे की सायक्लिक वोमिटिंग सिंड्रोमचे कारण स्पष्ट नाही. मात्र, काही संशोधनानुसार त्याचे काही कारण समोर आले आहेत.

  • गरमीच्या काळात ही समस्या उद्भवू शकते. 
  • शारीरिक थकवा जाणवतो त्यावेळी देखील सायक्लिक वोमिटिंग सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते. ज्या व्यक्तीला सायनसची समस्या असते किंवा सर्दी अन् अँलर्जीची समस्या असते त्यांना देखील उलटीची समस्या जाणवते.
  • अधिक तणाव जाणवत असेल तेव्हा देखील ही समस्या उद्भवू शकेत.
  • एखाद्या विषाणूची लागण झाली असल्यास ही समस्या उद्भवू शकते. 
  • गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास ही समस्या उद्भवू शकते.

हेही वाचा - अंकिता जळीतकांड : घटनेच्या दिवशी विकेशची होती साप्ताहिक सुटी; कंपनीच्या कर्मचाऱ्याने...

सायक्लिक वोमिटिंग सिंड्रोमचे लक्षण -

  • वारंवार डोकं दुखणे आणि मायग्रेनसारखी स्थिती निर्माण होणे
  • डायरिया असेल तेव्हा देखील उलटी होऊ शकते.
  • बद्धकोष्ठता, पोटात दुखणे, पोट खराब होणे
  • वारंवार उबाळी येणे
  • चक्कर येणे

सायक्लिक वोमिटींग सिंड्रोमचे परीक्षण -
या सिंड्रोमचे परीक्षण करण्यासाठी विशेष अशी काही पद्धती नाही. मात्र, वारंवार उलटीची समस्या उद्भवत असेल तर डॉक्टरांकडून पचनयंत्रणेचा तपास करून घेणे गरजेचे आहे. यामध्ये सिटी स्कॅन, अल्ट्रासाउंड, एंडोस्कोपी इत्यादी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पाचन यंत्रणेते काही बिघाड असेल तर डॉक्टर त्यानुसार उपचार देतात. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image