esakal | मेनोपॉजमध्ये ताणतणाव का जाणवतो? वाचा कोणत्या काळात घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

बोलून बातमी शोधा

menopause
मेनोपॉजमध्ये ताणतणाव का जाणवतो? वाचा कोणत्या काळात घ्यावा डॉक्टरांचा सल्ला
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : महिलांच्या जीवनात अनेक अडथळे येतात. त्यापैकीच एक म्हणजे मेनोपॉज. याच काळात पीरियड्स थांबतात. आपल्याला गेल्या 3 महिन्यांपासून पीरियड्स नसल्यास ते मेनोपॉज आहे, असा याचा अर्थ नाही. खरंतर मेनोपॉजमध्ये वर्षभरापासून पिरियड्स येत नसतात. साधारणपणे हे ४५ ते ५० वर्ष वयोगटात घडते. अनेकांना ३६ व्या वर्षीही मेनोपॉज येऊ शकतो. याला अॅप्लिकेशन मेनोपॉज म्हटले जाते. मेनोपॉजनंतर गर्भधारण शक्य नसते. या काळात फॉलीकल्सचे प्रमाण कमी होते. फॉलिकल्स तयार होण्यास थांबतात तेव्हा पिरियड्य येणे देखील बंद होते. त्यामुळे गर्भधारणा मुळीच शक्य होत नाही.

हेही वाचा: बाळांना कोरोनाचा धोका असतो का? वाचा काय सांगतात डॉ. देशमुख

लक्षणे -

  • कुटुंबनियोजनानंतर अनेक महिलांना वाटतं की मेनोपॉज चांगला आहे. मात्र, वास्तविक पाहता मेनोपॉज चांगला नाही. कारण त्यासोबत अनेक हार्मोनल बदल घडून येत असतात. त्यामध्ये मूड स्विंग्स, राग, अश्रू, वेदना अशा अनेक गोष्टींचा महिलांना सामना करावा लागतो. मात्र, काही महिला इतक्या भाग्यवान असतात की त्यांना अगदी सहजरित्या मेनोपॉज येतो.

  • मेनोपॉजचे पहिले लक्षण म्हणजे शरीरात उबदारपणा जाणवू लागतो. याला हॉट फ्लॅश असेही म्हणतात. अचानक जास्त घाम येणे, चेहरा मान आणि छातीवर जास्त उष्णता जाणवते. याशिवाय आपल्या योनीमध्ये कोरडेपणा आणि वेदना देखील जाणवू शकतात. त्यामुळे अनेक स्त्रिया लैंगिक संबंधात वेदनांचा सामना करतात.

  • मासिक पाळीत बदल होऊ शकतो. हे कमी-अधिक असू शकते. या काळात रक्तस्त्राव सौम्य किंवा वेगवान असू शकतो.

  • झोपेचा अभाव, मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग, लघवी कमी होणे किंवा वारंवार लघवी होणे ही देखील लक्षणे आहेत.

  • सर्वकाळ ताणतणाव जाणवणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, केस आणि त्वचेच्या ऊतींमध्ये बदल इत्यादी लक्षणे देखील आहेत. यानंतर, बहुतेक स्त्रियांमध्ये वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

  • मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका जास्त असतो. यामुळे हाडे कमकुवत होतात.

हेही वाचा: 'मी माझं आयुष्य जगलो', ८५ वर्षीय आजोबाने दिला तरुणाला बेड अन् स्वतः पत्करले मरण

डॉक्टरांना कधी भेटावे -

काही स्त्रियांमध्ये मेनोपॉज 40 वर्षांच्या वयाच्या आधी आलेला पाहायला मिळतो. तथापि, हे केवळ 1 टक्के महिलांनाच घडते. अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांना भेटले पाहिजे.

जर जास्त रक्त येत असेल तरीही, डॉक्टरांना भेटा. अधिक ब्लिडिंग होतंय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला किती तासांनंतर पॅड बदलावा लागतो हे समजून घ्या. आपण दिवसातून ५ वेळा पॅड बदलत असाल आणि वेदना होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)