दर दोन दिवसांत तुमच्या वजनामध्ये फरक जाणवतोय? मग असू शकतो 'हा' गंभीर आजार

टीम ई सकाळ
Thursday, 4 March 2021

शरीरातील टिशूमध्ये पाणी जमा होत असते. त्यामुळे शरीरावर सूजय येण्यास सुरुवात होते. तुम्हालाही असे लक्षण जाणवत असेल तर घाबरू नका. एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आम्ही सांगतोय तो आहार घेतला तरी तुमची समस्या दूर होईल.

नागपूर : तुमचे वजन संतुलित राहत नसेल आणि एक ते दोन दिवसात वजनामध्ये फरक जाणवत असेल तर तुम्हाला वॉटर रिटेंशन हा आजार असू शकतो. या आजारामध्ये शरीरातील अवयवामध्ये पाणी जमा होत असते. त्यामुळे हात, पाय, चेहरा आणि पोटातील मांसपेशींमध्ये सूजन येते. वॉटर रिटेंशनमुळे पाय दुखू लागतात. आपले शरीरातील मिनरलचा स्तर संतुलिक नसेल तर असे घडू शकते. त्यामुळे शरीरातील टिशूमध्ये पाणी जमा होत असते. त्यामुळे शरीरावर सूजय येण्यास सुरुवात होते. तुम्हालाही असे लक्षण जाणवत असेल तर घाबरू नका. एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आम्ही सांगतोय तो आहार घेतला तरी तुमची समस्या दूर होईल.

हेही वाचा - कोरोनाचा उद्रेक! मिनी लॉकडाऊननंतर आता ८ मार्चपर्यंत...

कशामुळे होतो वॉटर रिटेंशन आजार?
वॉटर रिटेंशनचे अनेक कारण असतात. त्यापैकी मीठाचे जास्त सेवन करणे हे मुख्य कारण आहे. मीठाच्या जास्त सेवनामुळे शरीरातील सोडियमचा स्तर वाढत जातो. तुम्हाला वॉटर रिटेंशन या आजारापासून सुटका हवी असेल तर आहारामध्ये मीठाचा वापर कमी करा. त्याचबरोबर महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन, शर्करा यांचे सेवन देखील हृदय आणि लीवरच्या आजाराला बळ पडू शकतात. अशा महिलांमध्ये देखील वॉटर रिटेंशनची समस्या जाणवू शकते.

योग्य खाद्यपदार्थ : 

  • मॅग्नेशिअममुळे शरीरातील पाण्याची अधिक मात्रा म्हणजेच वॉटर रिटेंशनची समस्या दूर होते. त्यामुळे आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि नट्सचा वापर करावा.
  • बटाटा, केळी आणि अक्रोड यामध्ये व्हिटामिन B6 असतात आणि हे जीवनसत्व वॉटर रिटेंशनची समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये दररोज बटाटा, अक्रोड आणि केळींचा समावेश करा.
  • जीवनसत्व क असणाऱ्या पदर्थांचे सेवन केल्या तुम्हाला अधिक फायदा होईल. यामध्ये संत्री, गाजर यासारख्या फळांचे नियमित सेवन केल्यास वारंवार लघूशंकेला जाऊन शरीरातील पाण्याची मात्र कमी होऊ शकते. 
  • तुम्ही तणावामध्ये असाल तर शरीरातील धोकादायक पदार्थ बाहेर निघण्यास अडचण निर्माण होते. त्यापासून वाचण्यासाठी तणावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमित योगाभ्यास आणि जवळपास अर्धा तास व्यायाम करायला पाहिजे.

हेही वाचा - बापरे! गृहविलगीकरणातील रुग्णाचा मुक्तसंचार, तपासणी पथकाकडून दंडात्मक कारवाई

या पदार्थांचे करू नका सेवन -

  • पॉकेटबंद खाद्य पदार्थांना हातही लावू नका. यामधअये मीठ, साकर आणि टेस्टला वाढविणारे तत्व असतात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात पाण्याची मात्रा वाढते. त्यामुळे तुम्हाला वॉटर रिटेंशनचा त्रास जाणवू शकतो. 
  • तुम्ही आहारामध्ये ब्रेडचा समावेश करत असाल, तर ते धोकादायक आहे. कुठल्याही रिफाइंड पदार्थांचा आहारामध्ये समावेश करू नका. त्यामुळे शरीरातील इंसुलिनचे प्रमाण कमी जास्त होत असते. त्यामुळे वॉटर रिटेंशनची समस्या वाढू शकते.
  • अल्कोहोल आणि धूम्रपान करू नका. अल्कोहोलचे सेवन केल्यानंतर अनेकवेळा लघुशंकेला जात असता. मात्र, त्यानंतर डिहायड्रेशनची समस्या जाणवत असते. त्यामुळे शरीरातील मिनरल्सचे प्रमाण कमी होते. 

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: symptoms of water retention nagpur news