health tips in rainy days : आला पावसाळा, तब्येती सांभाळा!

health tips in rainy days : आला पावसाळा, तब्येती सांभाळा!

नागपूर : मॉन्सूनच्या आगमनासोबतच पावसाळा (Rain) सुरू झाला आहे. पावसाळा आला की वातावरण बदलून अनेक छोटेमोठे आजार डोके वर काढतात. अशा वेळी आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे (Health care needs to be taken) असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साध्या व हलक्या आहारासोबतच नियमित योगा व प्राणायाम करण्याचा सल्ला (Advice to do regular yoga and pranayama) डॉक्टरांनी दिला आहे. (Take-care-of-your-health-on-rainy-days)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घाण, कचरा व अस्वच्छतेमुळे रोगराई वेगाने पसरते. ताप, सर्दी, खोकला, मलेरिया, डेंग्यूसारखे जीवघेणे आजार वाढतात. शिवाय पित्ताचे व संधीवाताचेही आजार डोके वर काढतात. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारावर खूप काही अवलंबून असते. नियमित संतुलित व पौष्टिक आहारासोबतच घरांमध्ये स्वच्छता राखल्यास या आजारांपासून स्वतःचा व कुटुंबीयांचा बचाव करता येऊ शकतो. सध्या कोरोना काळ असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचे अधिकाधिक सेवन करावे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

health tips in rainy days : आला पावसाळा, तब्येती सांभाळा!
व्याघ्र प्रकल्पासाठी आणखी किती पुरावे हवे? वाढतेय संख्या

सापांपासून सावध राहा

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आजूबाजूला सापांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अशावेळी सर्पदंश होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घरात किंवा कॅम्पाऊंडमध्ये साप शिरणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. घरात साप आढळल्यास ताबडतोब सर्पमित्रास फोन करावा. नागपूरकर श्रीकांत ऊके (9860032121), विश्वजित ऊके (9890522660), स्वप्नील बोधाने (9923891230), सचिन काकडे (8055042496), कुणाल जरविया (7385328987) किंवा समीर तुमडे (9730677775) या सर्पमित्रांशी संपर्क साधू शकतात.

पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

  • घराबाहेर पडताना शक्यतो छत्री किंवा रेनकोटचा वापर करा

  • पावसात भिजणे सहसा टाळा

  • ओले कपडे अंगावर अधिक वेळ ठेवू नये

  • पावसात भिजून घरी आल्यानंतर प्रथम गरम पाण्याने आंघोळ करून मगच कोरडे कपडे घाला

  • आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकल्यास त्वचेच्या आजारापासून बचाव करता येऊ शकतो

  • केस व ओले कपडे असताना थंड जागेत जाणे टाळावे, त्यामुळे ताप, सर्दी, खोकल्यासारखे आजार होऊ शकतात

  • विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नका

  • साबणाने हात स्वच्छ धुवा

  • सकाळी नियमित व्यायाम व प्राणायाम करा

  • घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

health tips in rainy days : आला पावसाळा, तब्येती सांभाळा!
जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

आहाराविषयी घ्यावयाची काळजी

  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हलका आहार घ्या

  • शिजवलेलेच साधे अन्नपदार्थ खा

  • बाहेरचे चमचमीत खाद्यपदार्थ खाणे सहसा टाळा

  • उघड्यावरील किंवा शिळे अन्नपदार्थ खाऊ नका

  • फूटपाथवरील फळांचे रस, बर्फमिश्रित द्रव्य पदार्थ, कुल्फी, आईसक्रीम खाणे शक्यतो टाळा

  • मसालेदार, तळलेले पदार्थ खाऊ नका

  • अती आंबट व थंड पदार्थांचे सेवन टाळा

  • आहारात अद्रक व गवती चहाचा समावेश करा

  • पाणी शक्यतो उकळून व गाळून प्या

  • फ्रीजमधील पाणी अजिबात पिऊ नका

(Take-care-of-your-health-on-rainy-days)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com