चहाप्रेमींनो सावधान! चहा पितानासुद्धा काळजी घ्या; काही सवयी ठरतील धोक्याच्या

टीम ई सकाळ
Wednesday, 20 January 2021

अनेकदा लोक थकवा आला किंवा डोकं दुखायला लागलं की चहा पितात. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या काही लोकांना तर चहाची सवयच लागलेली असते. 

मुंबई - थंडीच्या दिवसांत गरम पेय पिण्याचं प्रमाण वाढतं. यामध्ये चहाला जास्त पसंती दिली जाते. चहाप्रेमी तर कोणत्याही वेळेला चहा पितात. अनेकदा लोक थकवा आला किंवा डोकं दुखायला लागलं की चहा पितात. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या काही लोकांना तर चहाची सवयच लागलेली असते. पण तुम्हाला माहिती आहे का सतत, वेळी-अवेळी चहा पिणं हे आरोग्यसाठी धोकादायक आहे. 

जेवणानंतर चहा पिणं
काही लोकांना जेवल्यानंतर लगेच चहा प्यायची सवय असते. मात्र आरोग्यसाठी ही सवय चांगली नाही. जेवणानंतर चहा प्यायल्यानं शरीराला अन्नपदार्थांमधून मिळणारी पोषक तत्वे शरिराला मिळत नाहीत. यामुळे आरोग्याच्या तक्रारी जाणवतात. जेवण आणि चहा यामध्ये किमान एक तासभराचे अंतर असायला हवं. 

हे वाचा - डायबेटीजचे रुग्ण खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या काय आहेत फायदे-तोटे

चहा जास्त उकळणे
चहा बनवताना तो जास्त वेळ उकळवला जातो. यामुळे चहाची चव वाढते, चांगला होतो असा समज आहे. मात्र चहा जास्त उकळवू नये. यामुळे अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच जास्त उकळवलेला चहा पिणं टाळावं. 

रिकाम्या पोटी चहा 
दिवसाची सुरुवातच बहुतांश लोक चहाने करतात. सकाळी चहा प्यायला अडचण नाही पण रिकाम्या पोटी पिणं धोकादायक असतं. यामुळे अॅसिडीटीचा त्रास वाढू शकतो. तसंच कॅन्सरचाही धोका निर्माण ङोतो. सकाळी सर्वात आधी पाणी आणि त्यानंतर थोडं खाऊन चहा पिणं चांगलं. 

हे वाचा - महिलांसाठी नव्हे, आता पुरुषांसाठीही आल्या गर्भ निरोधक गोळ्या!

रात्री झोपण्यापूर्वी चहा
सकाळी चहा पिण्याची सवय तर अनेकांना असते. पण काही लोकांना रात्रीच्या वेळी चहा पितात. त्यातही झोपण्याआधीही चहाची सवय काहींना असते. ही सवय आरोग्यसाठी धोकादायक असून चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे झोप न येण्याची समस्या भेडसावू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tea drinking odd time effect on health care tips