महिलांसाठी नव्हे, आता पुरुषांसाठीही आल्या गर्भ निरोधक गोळ्या!

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 13 January 2021

आतापर्यंत फक्त महिलांसाठी गर्भ निरोधक गोळ्या (birth control pills) बाजारात उपलब्ध होत्या, पण आता पुरुषांसाठीही अशा प्रकारच्या गोळ्या मिळणार आहेत.

नवी दिल्ली- आतापर्यंत फक्त महिलांसाठी गर्भ निरोधक गोळ्या (birth control pills) बाजारात उपलब्ध होत्या, पण आता पुरुषांसाठीही अशा प्रकारच्या गोळ्या मिळणार आहेत. या गोळ्या खास पुरुषांसाठी असणार असून त्या प्रभावी ठरतील असं सांगण्यात आलंय. 

वैज्ञानिकांशी अशा गोळ्यांचा शोध लावला असून त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. संततीनियमनाच्या क्षेत्रात हे मोठे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया एका वैज्ञानिकाने दिली आहे. दरदोज एक गोळी घेतल्यास पुरुषांनाही संततीनियमन करता येणार आहे. महिला आतापर्यंत ज्या गोळ्या गर्भ निरोधासाठी वापरत होत्या, तशाच प्रकारच्या या गोळ्या असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. 

बॅनर्जींच्या माता सीतेवरील वक्तव्याने संतांमध्ये आक्रोश; शीर कापणाऱ्याला 5...

महिलांनासाठी असल्या गोळ्यांप्रमाणेच या गोळ्या आहेत. याचा विकास लॉस एजेंसमधील बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आला आहे. माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, या गोळ्यांना dimethandrolone undecanoate (DMAU) असं म्हटलं जात आहे. या गोळ्या हार्मोन्सवर प्रभाव टाकतात, जेणेकरुन पुरुषांच्या विर्यामधील semen प्रजोत्पादनास आळा बसतो. या गोळ्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आलाय. 

सेन्सेक्स 50000 अंकापासून काही पावलं दूर, निफ्टीचीही चांगली सुरुवात

महिलांप्रमाणे पुरुषांनाही गोळ्या घेऊन संततीनियमन करता यावे, यासाठी वैज्ञानिक 1950 पासून प्रयत्न करत आले आहेत. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं असं म्हणावं लागेल. असे असले तरी या गोळ्या बाजारात कधी येतील हे निश्चित सांगता येत नाही. तसेच यामुळे काही दुष्परिणाम होतात का, हेही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, समाजात कायमच संततीनियमनासाठी महिलांवर दबाव टाकलो जातो. मुलं होऊ नये यासाठी महिलांनीच काळजी घ्यावी असं ग्रहित धरल जातं. संततीनियमन हे महिलांइतकेच पुरुषांचीही जबाबदारी आहे, याचा विसर पुरुष प्रधानाला समाजाला पडल्याचं दिसतं. मात्र, वैज्ञानिकांच्या या नव्या शोधामुळे या विचारात काही बदल होईल, अशी आशा आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like women men can now take birth control pills

Tags
टॉपिकस
Topic Tags: