
प्राणायाम करताना या चूका टाळा! महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
आपल्या भारतीय समाजात योग प्राणायाम व ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. निरोगी जीवनशैलीसाठी (Health) योग(Yoga), प्राणायाम (Pranayam)महत्त्वाचा आहे. मात्र नुकतंच नाशिकमध्ये प्राणायाम करताना एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला आरोग्याबाबत जागरूक होती. त्यामुळे योग प्राणायाम करताना नेमकी कशी काळजी घ्यायला हवी, या प्रश्नाने अनेकांना ग्रासले.(Pranayam Bennifits For Health)
हेही वाचा: नाशिक : योगा करताना 30 वर्षीय महिलेचा मृत्यू

Yoga
योगतज्ज्ञ काय म्हणतात (Expert Opinion)
योगाचार्य रचना साठे यांनी सांगितले की, तिला त्यावेळी जो त्रास झाला, याबाबत प्रकरणाशी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञच सविस्तर सांगू शकतील. पण प्राणायामबाबत काही गोष्टींकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. प्राणायाममध्ये (Pranayam) सराव महत्त्वाचा आहे. बरेच प्राणायाम हे आपल्या शहराच्या धावपळीत सुटेबल नाहियेत. कारण आपल्या आजूबाजूला प्रचंड प्रदूषण आहे. कुटुंबात राहत असताना विविध कर्तव्य पार पाडावी लागतात. त्यामुळे प्राणायाम करत असताना शुद्ध पदार्थ, शुद्ध वातावरण, हलके आणि मजबूत शरीर हे घटक लागतात. त्यामुळे बरेच प्राणायाम काळजीपूर्वक करायला हवेत. कुठलेही पुस्तक बघून, व्हिडिओ बघून तसे केले तर त्याचे परिणाम योग्य मिळतातच असं नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास कोणाला बीपीचा त्रास असेल तर, त्या केसमध्ये कपालभाती करू नये थंडीमध्ये शीतली प्राणायाम करायचा नसतो. काय करावे काय करू नये हे शिक्षण तुम्हाला योग्य योगशिक्षकामार्फत मिळू शकते. त्यामुळे प्राणायाम योग शिक्षकाकडूनच करून घ्यावा. तो शिकावा. महत्वाचे म्हणजे नाशिकमधील महिलेची लाईफस्टाईल काय होती याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही योगासनाची प्रॅक्टीस करता तेव्हा त्याचा काय बेस आहे? ते टाईम टेस्टेड आहे का? ते तुम्हाला सुटेबल आहे का? यातही बॅलन्स शोधावा लागतो, असेही रचना म्हणाल्या.
योगशिक्षक मिनाक्षी सोमाणी म्हणाल्या की, कोणताही योगप्रकार करायचा असेल तर तो योगगुरूंच्या मार्गदर्शनाखालीच केला जावा. आपल्या मनाने कोणतीही योगप्रक्रिया करू नये. तुम्हाला जर आधीपासूनच काही आरोग्याच्या समस्या असतील तर योगक्रिया सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला जे योगमार्गदर्शन करणारे आहेत, त्यांना विचारून ते ज्या प्रक्रिया सांगतील त्याच कराव्यात. मनाने कुठलीही क्रिया केली तर त्याचा आपल्याला अपाय होऊ शकतो.(Pranayam Bennifits For Health)
हेही वाचा: कॅलरीज बर्न करायच्या आहेत? मलायका अरोराची सोपी Trick फॉलो करा

fitness
निरोगी आयुष्यासाठी चार मुलभूत गोष्टी आवश्यक (Healthy Lifestyle Goals)
योगासन करताना तुमचे रोजचे जगणे चालूच असते. त्यामुळे योगा करतोय म्हणजे मला काही होणारच नाही, असं नसतं, असेही रचना साठे सांगतात. कारण एक निरोगी आयुष्य हवे असेल तर, चार मुलभूत गोष्टी आवश्यक आहेत. पहिला म्हणजे चांगला व्यायाम, दुसरे योग्य पोषक आहार किंवा डाएट, तिसरी रात्रीची शांत झोप तर चौथा तुमचा सकारात्मक दृष्टीकोनही कारणीभूत असतो. तणावही अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला जातो. हे सगळे प्रकार तुमच्या हेल्दी लाइफस्टाईलसाठी समान कारणीभूत आहेत. त्या महिलेला नेमका हा त्रास कशामुळे झाला हे सांगणे अवघड आहे.
हेही वाचा: मिलिंद सोमणचा आईसह Squats करतानाचा व्हिडिओ पाहिलात का?

Pranayam
प्राणायाम केल्याने होणारे फायदे | Benefits of Pranayam
प्राणायामामुळे हृदय रोगाचा धोका कमी होते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो.
शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते.
व्यायाम केल्याने मास पेशींची क्षमता वाढते ज्यामुळे पाठ दुखी, कंबर दुखी आदी समस्या दूर होतात.
हेही वाचा: थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स
Web Title: Pranayam Benefits For Health Yoga Expert Opnion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..