esakal | युरीक अ‌ॅसिडची पातळीवर नियंत्रण कसे मिळवायचे? वाचा उपाय

बोलून बातमी शोधा

URIC ACID 1.jpg
युरीक अ‌ॅसिडची पातळीवर नियंत्रण कसे मिळवायचे? वाचा उपाय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : प्युरीन नावाचे रसायन तोडून शरीरात युरीक अॅसिड तयार होते. हे अॅसिड सर्वसाधारणपणे रक्तामध्ये सापडणारे वेस्ट मटेरियल आहे. आपल बदलता आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे युरीक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढते. तसेच कधीकधी दुर्मिळ अनुवांशिक विकारांमुळे युरीक अॅसिडची पातळी वाढू शकते. आपल्याला युरिक अॅसिड नियंत्रित ठेवायचे असेल तर आहारामध्ये बदल करण्याची गरज आहे. अनेकवेळा युरीक अॅसिड रक्तामध्ये विरघळून मूत्रपिंडात जाते आणि लघवीवाटे बाहेर पडते.

शरीरात अधिक प्रमाणात युरीक अॅसिड असेल तर हायपर्युरीसीमिया स्थिती तयार होऊ शकते. यामध्ये युरीक अॅसिडचे स्फटीके तयार होतात. तसेच ते सांध्यामध्ये जमा होऊन संधीवात होऊ शकतो. तसेच मूत्रपिंडात गेल्यानंतर किडीन स्टोन देखील होऊ शकतो. तसेच यावर नियंत्रण न ठेवल्यास युरिक अॅसिड कायमस्वरुपी हाडे, ऊती यामध्ये साचतात. त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार आणि हृदयाचे आजार उद्भवू शकते.

हेही वाचा: कुठं मृत्यूचं तांडव, तर कुठं सुविधांची वानवा; वाचा नागपूर ग्रामीणमधील कोरोनाचं वास्तव

युरिक अॅसिड आणि संधीवाताचे निदान कसे केले जाते?

यूरिक अ‌ॅसिड पातळी संतुलित करण्यासाठी रक्त चाचणी केली जाते. किडीन स्टोनने त्रस्त असल्यास रक्तातील युरिक अ‌ॅसिडची पातळी शोधणे गरजेचे असते. तसेच सांध्यामध्ये युरिक अॅसिड आहे किंवा नाही हे एक्स रेच्या सहाय्याने शोधले जाऊ शकते.

युरीक अॅसिडची पातळी हाय असेल तर उपचार -

युरीक अॅसिडमुळे तुम्हाला संधीवात होत असेल तर सूजन आणि वेदना कमी करण्यासाठी काही औषधे वापरले जाऊ शकते. त्यासाठी अल्कोहोल आणि गोड पेय्य पिणे टाळायला पाहिजे. मात्र, पाणी जास्त पिणे गरजेचे आहे. त्यामुळे किडीन स्टोन देखील बरा होतो. दररोज किमान आठ ग्लास पाणी पिणे चांगले.

हेही वाचा: बेड मिळत नसल्यानं होताहेत रुग्णांचे मृत्यू; नागपुरात दर दिवसाला वाढीव ६०० खाटांची गरज

युरिक अॅसिडची पातळी रोखता येते?

शरीरातील युरीक अॅसिडची वाढणारी पातळी रोखता येते. युरिक अॅसिडमुळे तयार होणारे क्रिस्टल कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषधं लिहून देतात. त्याचे सेवन केल्याने युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)