हिवाळ्यात जास्त भूक लागतेय? 'अशी' करा कंट्रोल; वजनही वाढणार नाही : Health News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळ्यात जास्त भूक लागतेय? 'अशी' करा कंट्रोल; वजनही वाढणार नाही

हिवाळ्यात जास्त भूक लागतेय? 'अशी' करा कंट्रोल; वजनही वाढणार नाही

Tips to control your appetite in winter : तुम्हाला हिवाळ्यामध्ये खूप भूक लागते का? मग काळजी करू नका. याबाबतीत तुम्ही एकटे नाही. हिवळ्यामध्ये खूप जास्त भूक लागणे किंवा जास्त जेवण करणे सामान्य गोष्ट आहे. खरं तर वातावरणाचे तापमान कमी होते तेव्हा आपल्या शरीराचे तापमान देखील कमी होते. अशा स्थितीमध्ये शरीर स्वत:ला गरम ठेवण्यासाठी उर्जा निर्माण करते आणि ही उर्जा शरीराला जेवनामधून मिळते. त्यामुळे अशावेळी लोक जास्त खातात. दुसरीकडे हिवाळा सुरु झाला की लोक फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी करतात. बहुतेक लोकांना हिवाळ्यात बाहेर पडणे आवडत नाही. हिवळ्यात दिवस लहान असतो त्यामुळे लोकांकडे कमी वेळ असतो. ऑफिसचे काम संपेपर्यंत रात्र होऊन जाते. अशावेळी फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी होणे सहाजिक आहे.

जेवनामुळे आपल्या शरीरातील मेटोबोलिज्म मजबूत होते. त्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढण्यासाठी मदत मिळते. साधरणत: आपले शरीर हेल्दी सॅलड, फळ किंवा भाज्यांना पचवू शकेलअशा गोष्टींसाठी तयार नसते. पण खरतर हे शरीर गरम ठेवण्यासाठी मेटाबोलिज्म वाढणे गरजेचे आहे आणि ते अतिरिक्त जेवण करुनच वाढू शकते. त्यामुळेच लहाणपणापासूनच आपल्या हिवाळ्यामध्ये जास्त खाण्याची सवय असते. पण या सर्वामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची शक्यता टाळता येत नाही.

हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट

जास्त भूक लागू नये म्हणून काय करावे

पोटभर नाश्ता करा

हिवळ्यामध्ये जास्त भूक लागू नये त्यासाठी सकाळी सकाळी पोटभर नाष्टा करा. नाश्त्यामध्ये जास्त प्रोटीन आणि फायबर असू द्या. फायबरयुक्त फुड जसे की रागी, ज्वार, बाजरा, मक्का, ओटस् आणि दलिया सारख्या पदार्थांचे सेवन करा. त्याशिवाय हंगामी फळे आणि भाज्या जसे की, गाजर, संत्री, पालक, मेथी, मुळ असे पदार्थ डाएटमध्ये समाविष्ठ करा.ज्या फुडमध्ये जास्त फायबर असते त्याला पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे दिर्घकाळ भूक लागत नाही.

फिजिकल अॅक्टिीव्हीटी गरजेची

हे गरजेचे आहे की हिवळ्यामध्ये दिवस लहान होतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाहेर चालायला जाऊ शकत नाही. कामामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालायला जा. हिवाळ्यामध्ये बाहेर फिरण्याचे प्लॅन करा. त्यामुळे तुमच्या शारीरीक हलचालीमध्ये वाढ होईल.

हेही वाचा: कोरोनाची लाट ओसरताच लोक निघाले पर्यटनाला; 'हे' राज्य अव्वल

उन्हामध्ये फिरा

हिवाळ्यात कमी ऊन पडते पण तरीही काही वेळ कोवळ्या उन्हामध्ये नक्की फिरा. जर ते शक्य नसेल तर लाईट थेरपी घेऊ शकता.

गरम पाणी प्या

सकाळी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्या. त्यामुळे पोट साफ होईल आणि मेटाबॉलिज्मला देखील बुस्ट मिळेल. गरम पाण्यामुळे फक्त वजन निंयत्रित तर राहतेच पण सर्दी-खोकला देखील होत नाही.

द्रव्य पदार्थांचे जास्त सेवन करा

हिवाळ्यामध्ये तुम्हाला जास्त भूक लागते, अशावेळी चपाती किंवा भात खाण्याऐवजी सुप, डाळ किंवा ज्युसचे सेवन करा. द्रव्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहते.

loading image
go to top