योगा लाईफस्टाईल : मनोमय कोष आणि ध्यानधारणा

प्राणमय कोष पाच प्राणांने (लाइफ एनर्जी) बनलेला असतो व तो शरीराला एका विशिष्ट प्रकारे काम करण्यासाठी मदत करतो.
Yoga
YogaSakal

मागील भागात आपण अन्नमय आणि प्राणमय कोषासंदर्भात विस्ताराने पाहिले. आज आपण प्राणमय कोषासंदर्भात आणखी व मनोमय कोषासंदर्भात जाणून घेऊयात.

प्राणमय कोष पाच प्राणांने (लाइफ एनर्जी) बनलेला असतो व तो शरीराला एका विशिष्ट प्रकारे काम करण्यासाठी मदत करतो. शरीरातून वाहणाऱ्या या ऊर्जेच्या प्रवाहांना वायू असे म्हणतात. वायूंचे पाच प्रकार आहेत.

  • व्यान - बाहेरील बाजूस प्रवाहित होणारी हवा. ही शरीरातील अत्यंत महत्त्वाची हवा असून, ती शरीरातील सर्व हालचालींमध्ये समन्वय राखण्याचे काम करते. ती शरीरभर पसरते व अन्नापासून श्वासापर्यंतच्या मार्गाने मिळालेली ऊर्जा शरीरात पोचवते.

  • उदान - वरील दिशेने वाहणारी हवा. हिचे कार्य घसा आणि डोक्याच्या टोकापर्यंतच्या (टाळू) भागात चालते. याचाच अर्थ ती घशाची पोकळी, नाक, घसा, कान, डोळे, जीभ व कपाळ या भागांत काम करते. तिच्याद्वारे आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नावर नियंत्रण ठेवले जाते.

  • प्राण - पुढील दिशेने वाहणारी हवा. ती नाकाचे टोक आणि डायाफ्रामच्या वरील भागापर्यंत काम करते. त्याद्वारे श्वास घेणे व बाहेर सोडण्याच्या क्रियेला कार्यान्वित केले जाते.

  • समान - यात हवेचा समतोल साधला जातो. ती पोटामध्ये नाभी ते हृदयापर्यंतच्या भागात कार्यरत असते. त्याद्वारे चयापचय क्रिया कार्यान्वित व नियंत्रित केली जाते, त्याचबरोबर हृदयाचे कार्य आणि रक्ताभिसरणाची क्रियाही केली जाते.

  • आपन - ही दूर जाणारी, खालील बाजूस वाहणारी हवा आहे. ती नाभीपासून गुदद्वारापर्यंतच्या भागात कार्य करते. ती शरीरात निष्कासन व उत्सर्जनाचे काम करते.

मनोमय कोष

पाच कोषांतील तिसऱ्या क्रमांकाचा कोष आहे मनोमय कोष, मनाचे आवरण. याच संबंध तुम्ही कसा विचार करता, काय विचार करता, तुम्ही तुमच्या विचारांवर आणि भावभावनांवर कशाप्रकारे प्रक्रिया करता याच्याशी येतो. मनोमय कोष अन्नमय व प्राणमय कोषांपेक्षा अधिक सुक्ष्म असून, तो त्या दोन्ही कोषांना एकत्र जोडतो. हा कोष आतील दोन व बाहेरील दोन आवरणांतील दूत म्हणून कार्य करतो. तो बाहेरील जगातील अनुभव व भावना आतील जगापर्यंत पोचवतो आणि त्याचा परिणाम आतील जगाकडून बाहेरील आवरणावर होतो. मोह आणि मोक्ष हे दोन मनोमय कोषाचे गुणधर्म आहेत

तैत्तिरीय उपनिषदानुसार, आपल्या शरीरात आणखी एक शक्ती कार्यरत असते आणि तिला कोष असे म्हणतात. ती विचारांच्या ऊर्जेपासून बनलेली असते. मनोमय कोष आपल्या ऐच्छिक मनात (मानस), अचेतन मनात आणि आकलनशक्तीच्या पाच अवयवांत (दृष्टी, ऐकणे, वास घेणे, चव घेणे आणि स्पर्श) यांत तयार झालेला असतो. तो मनाच्या सर्व कार्याशी व आयुष्याचा अर्थ आपण कसा लावतो याच्याशी संबंधित असतो. आपले मन आपण त्याला जसे तयार करतो त्याप्रमाणे फुलांनी भरलेले असू शकते किंवा अगदी शेणाने. येथे योगाचा प्रवेश होतो, जो मनोमय कोषातील उच्च दर्जाची कार्ये करून घेण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. आपण पुन्हा एका ध्यानधारणेच्या महत्त्वाकडे आलो आहोत. आपल्याकडे मनाला प्रशिक्षित करण्याची ताकद आहे. त्याद्वारे आपण आपले आयुष्य शांत आणि सोपे करू शकतो. मनोमय कोषाची हीच खरी शक्ती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com