योगा लाइफस्टाइल : योगासनांचा सराव

Yoga
Yoga

योग हे यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी या घटकांवर आधारित असतात. यापैकी एखादा घटक जरी बिघडला- म्हणजे त्याचा सराव कमी झाला असेल, किंवा झालाच नसेल, तर एकूण संतुलन बिघडते. त्यामुळे योगासने आणि प्राणायामांचा आदर्श सराव कसा हवा हे आपण बघू या. गेल्या आठवड्यात काही गोष्टी आपण जाणून घेतल्या. आता आणखी काही गोष्टी जाणून घेऊ.

योगासनांचा सराव करताना खोलीत ‘क्रॉस व्हेंटिलेशन’ होत असेल आणि पुरेसा सूर्यप्रकाश असेल याची खातरजमा करून घ्या. खोली स्वच्छ असली पाहिजे. शक्यतो छत नसलेल्या जागेत सराव करणं टाळा. योगासनांचा सराव म्हणजे स्वतःच्या आत जितकं खोल जात येईल तितकं खोल जाणं असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे हा सराव बाहेर करणं योग्य नाही. योगासनं बाहेर मोकळ्या वातावरणात केलीत, तर तो व्यायामाचा प्रकार होईल-योग नव्हे हे समजून घ्या. पूर्वीच्या काळी योगासनं गुहांमध्ये किंवा छोट्या झोपड्यांमध्ये केली जात असत- त्याच्यामागे हेच कारण होतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

योगासनातल्या प्रत्येक स्थितीमध्ये श्वासोच्छ्वासांवर नियंत्रण असणं गरजेचं असतं. आसनं करताना तुम्ही श्वासोच्छासांबाबत जागरूक नसाल, तर ते केवळ जिम्नॅस्टिक्स किंवा सर्कसचा प्रकार ठरेल. 

जोपर्यंत तुमची ध्यानावर पकड बसत नाही, तोपर्यंत म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात शांत जागी ध्यान करा आणि कोणताही आवाज तुमचं चित्त विचलित करणार नाही याची काळजी घ्या. ध्यानासाठी ‘वातावरणनिर्मिती’ म्हणून संगीत वापरणं, सुगंधी मेणबत्त्या किंवा डिफ्युजर्सचा वापर करणं या गोष्टी टाळा. ध्यान करण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी तुम्ही ‘बाहेरून’ करायचा प्रयत्न कराल, तितकं तुम्ही तुमच्यातल्या क्षमता कमी करत असता हे लक्षात घ्या. तुम्ही जितक्या बाह्य गोष्टींना महत्त्व द्याल, तितके तुम्ही त्यांच्यावर विसंबून बनायला लागाल. सुरुवातीच्या काळात सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करणं ही असते. श्वास ही गोष्ट सगळीकडे समान असते आणि ती अर्थातच खूप शुद्ध असते. 

दैनंदिन सराव अनिवार्य आहे. ही गोष्ट साप-शिडीच्या खेळासारखी आहे. समजा सहा महिने सराव केल्यानंतर आपण खूप मोठ्या पातळीवर पोचलो आहोत असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही ‘ब्रेक’ घेण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही पुन्हा जिथून सुरुवात केलीत, तिथपर्यंत जाल. रोज सराव न करणं म्हणजे ऊर्जा वाया घालवणं असतं. आपण जेव्हा टीव्ही बघत असतो, फोनचा वापर करत असतो, वाचत असतो, ऐकत-बोलत असतो, विचार करत असतो, तेव्हा मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडत असते. आपण ही ऊर्जा सातत्यानं गमावत असतो. ही ऊर्जा टिकवून ठेवणं आणि ती विकसित करणं महत्त्वाचं असतं आणि योग्य प्रकारे योगासनं, प्राणायाम आणि ध्यान यांच्या माध्यमातून ही ऊर्जा टिकवून ठेवणं शक्य होतं. प्राणायाम, ध्यान वगैरे गोष्टींमुळे ही ऊर्जा दिवसभर टिकते आणि हळूहळू ती आणखी एखादा दिवस टिकायला सुरुवात होते. तुम्ही योगासनांचा सराव जितक्या सखोल पद्धतीनं कराल आणि आपण कशा प्रकारे विचार करतो, बोलतो, कृती करतो आदी गोष्टींबाबत जितके सजग बनाल, तितका तुमच्यातल्या ‘स्व’चा अनुभव वाढत जाईल.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com