'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vitamin-D for health
'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे!

'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे!

शरीर मजबूत ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असावी लागते. शरीराच्या विकासासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्त्वे आवश्यक असतात त्याचप्रमाणे व्हिटॅमिन-डीचीही गरज असते. जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर वाढत्या वयाबरोबर हाडांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनाच व्हिटॅमिन डीची गरज आहे. पण काही लोकांना त्याची गरज जास्त असते. या लोकांनी उन घेण्याबरोबरच व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खाणे गरजेचे असते. त्यामुळे या लोकांनी व्हिटॅमिन डी खाणे गरजेचे आहे.

हेही वाचा: बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? शरीरावर होतात 'हे' परिणाम

Nonveg

Nonveg

या चार लोकांनी काळजी घेणे गरजेचे

नॉनव्हेज जास्त खाणारे- जे लोकं मांसाहार करतात त्यांच्यात व्हिटॅमिन डीची ची कमतरता असू शकते. महत्वाचं म्हणजे मांसाहारात उच्च प्रथिनं असतात. पण व्हिटॅमिन डीसाठी भाज्या फळे, आणि शरीराला उन मिळणे गरजेचे असते.

ऑफिसला जाणारे- ऑफिसला जाणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. ऑफिसला जाणाऱ्यांना सूर्यप्रकाशात बराच वेळ बसण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे डेस्क जॉब करणाऱ्यांपैकी बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते.

हेही वाचा: कॅब चालक निघाला Uberचा मालक!

Vitamin D For Health

Vitamin D For Health

50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाचे लोक- 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्येही व्हिटॅमिन-डीची कमतरता असू शकते. असे झाल्यास या व्यक्तींमध्ये चिडचिड, निद्रानाश, तणाव, एकटेपणा किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.

निमगोरे लोक- निमगोऱ्या लोकांच्या त्वचेतील पहिल्या थराच्या एपिडर्मलमध्ये मेलेनिन जास्त असते. त्यामुळे अशा लोकांना जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डीची गरज असते.

हेही वाचा: प्राणायाम करताना या चूका टाळा! महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Web Title: Vitamin D Deficiency These People Face The Problem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top