बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? शरीरावर होतात 'हे' परिणाम| Cracking Fingers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cracking Fingers health issue
बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? शरीरावर होतात 'हे' परिणाम| Cracking Fingers

बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? शरीरावर होतात 'हे' परिणाम

आपण माणसं नेहमीच आवश्यकता नसताना काही काही कामं करत असतोय पण त्याला मिळणारा आनंद हा त्याच्यासाठी महत्वाचा असतो. काही जणांना बसल्याबसल्या बोटं मोडायची सवय असते. बोटं मोडताना हाडातून येणारा आवाज ऐकून त्यांना आनंद होतो. त्यामुळे गरज नसताना दिवसभरात अनेकदा लोकं बोट मोडतात. Dr Karl Kruszelnicki यांनी आपल्या टिकटॉक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी असा दावा केला आहे की, बोटं सारखी मोडल्यामुळे शरीराच्या सांध्यांमध्ये गॅप्स येऊ लागतात. त्यामुळे असे केल्याने भविष्यात त्यांना अनेक समस्या येऊ शकतात.

हेही वाचा: Morning Drinks : रिकाम्यापोटी जीरं, ओव्याचे पाणी प्यायल्याने होतील 'हे' फायदे

येऊ शकतात या समस्या

व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार हात किंवा बोटं मोडण्याच्या सवयीमुळे शरीराची 75 टक्के पकड सैल होऊ लागते. हे चिंतेचे कारण आहे. काही काळापूर्वी एका तज्ज्ञाने हा समज खोटा ठरवला होता. त्याने म्हटले होते की, सांधेदुखीचा त्रास हा बोटे मोडल्याने होतो. तर Dr Karl Kruszelnicki म्हणतात की, सांधेदुखी नाही तर पकड सैल होण्याचा धोका नक्की निर्माण होतो. याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

हेही वाचा: Belly Fat कमी करण्यासाठी 'हे' उपाय केल्याने होतील फायदे

Cracking Fingers

Cracking Fingers

सांध्यांना येऊ शकते सूज

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जे लोक रोज बोटे मोडतात, त्यांची हाताची पकड सामान्यांपेक्षा ७५ टक्के कमी होते. Dr Karl Kruszelnicki यांनी ३५ वर्षे नियमित बोटे मोडणाऱ्या ३०० लोकांचे सर्वेक्षण केले. त्यांच्या तपासणीत सांधेदुखीसारखा कोणताही मोठा आजार आढळला नाही, पण, त्यांच्या सांध्यांमध्ये सामान्य लोकांपेक्षा जास्त सूज आढळून आली. जेव्हा आपण अशाप्रकारे बोटे मोडतो तेव्हा सांधे आणि हाडातील जागा मोठी होते. ही जागा मज्जासंस्था (लिगामेंट्स) शोषून घेते. त्यामुळे शरीरातील गॅस वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सावध राहून या सवयीपासून दूर राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा: गायीचं दूध प्यायल्याने कोरोनापासून बचाव शक्य, अभ्यासात स्पष्ट

Web Title: Habit Of Cracking Fingers Can Cause Of These Type Of Health Problem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health news
go to top