Thur, March 23, 2023

Vrikshasana : वृक्षासन
Published on : 3 March 2023, 4:11 am
वृक्षासन हे तोलात्मक आसन सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. दंडस्थिती म्हणजेच उभ्याने करण्याचे हे आसन आहे. वृक्ष म्हणजे झाड. झाड जसे उंच छान दिसते, तसेच या आसनाची कल्पना केली आहे. म्हणून हे वृक्षासन.
असे करावे आसन
प्रथम ताठ उभे राहावे. श्वास संथ सुरू असावा. नजर स्थिर असावी.
त्यानंतर सावकाश एक पाय गुडघ्यात वाकवून हाताच्या आधारे वरच्या दिशेला घेऊन त्या पायाचा तळवा दुसऱ्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूला टेकवावा.
स्थिरता आली, की दोन्ही हातांचा नमस्कार करावा किंवा हात बाजूला घ्यावेत किंवा दोन्ही हात वरच्या दिशेला ताणून घ्यावेत. दोन्ही दंड कानाला टेकलेले असावेत.
आसनामध्ये शक्य तेवढा वेळ स्थिर राहावे.
आसन सोडल्यावर दुसऱ्या पायानेही ते करावे.
आसनाचा फायदा
एकाग्रता वाढते.
चिडचिड, त्रागा कमी होतो.
मन शांत राहते.
उंची वाढविण्यास मदत होते.