esakal | पोट सारखं बिघडतंय? पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी लक्षात ठेवा 4 गोष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

stomack disorder

निरोगी राहण्यासाठी आपली पचनसंस्था चांगली असावी लागते. जर तुमची पचनसंस्था कमकुवत झाली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो.

पोट सारखं बिघडतंय? पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी लक्षात ठेवा 4 गोष्टी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पुणे: निरोगी राहण्यासाठी आपली पचनसंस्था चांगली असावी लागते. जर तुमची पचनसंस्था कमकुवत झाली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो. तसेच वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आपण सर्वांनी पचनसंस्था कशी मजबूत होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. 

पोटाच्या समस्यांमध्ये अपचन, बद्धकोष्ठता किंवा पोटदुखी समावेश होतो. जर तुम्हाला बऱ्याचदा पोटाचा त्रास होत असेल तर ती पचनसंस्था कमकुवत असल्याची चिन्हे असतात. यासाठी आपली पचनसंस्था मजबूत कशी करावी, त्यासाठी कोणते उपाय करावेत याबद्दलची माहिती या लेखात दिली आहे.
पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठीचे उपाय-

1. पाणी पुरेसं घेतले पाहिजे-
आपल्या शरीरासाठी पाणी अत्यावश्यक गोष्ट आहे. शरीराला हायड्रेट करत राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. पाणी हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करत असतात. यामुळे पचनशक्ती मजबूत होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे दिवसातून प्रत्येकाने 4-5 लीटर पाणी प्यायले पाहिजे. तसेच तुम्ही लिंबूपाणीही पिऊ शकता. सकाळी दररोज लिंबूपाणी प्यायल्याने पचनसंस्थाही मजबूत होऊ शकते.

Navratri 2020: उपवास असेल तर काय खावं आणि काय टाळावं

2. Vitamin Cयुक्त असणाऱ्या पदार्थांचे सेवन-
आपल्या आहारात व्हिटॅमिन सी-समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. व्हिटॅमिन सी-समृद्ध अन्नपदार्थांच्या सेवनामुळे पचनशक्ती मजबूत होऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारात ब्रोकोली, संत्री, किवी आणि स्ट्रॉबेरी यांसाख्या व्हिटॅमिन सीचे जास्त प्रमाण असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तसेच खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होण्यासाठी व्हिटॅमिन डीही अतिशय फायदेशीर आहे.

3. प्रमाणात खाल्लं पाहिजे- 
 जेवण करताना कधीच पुर्ण पोट भरून खाऊ नये, यामुळे पाचनसंस्थेला अडचणी येऊ शकतात. शक्यतो 80 टक्के पोट भरेपर्यंत खाल्ले पाहिजे. जर अधिक अन्नाचे सेवन केले तर पोटाच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोटाचा विचार करून मनावर ताबा ठेवला पाहिजे.

शरीरात व्हिटॅमिन A ची कमतरता असेल तर करा या पदार्थांचा आहारात समावेश

4. अनेकदा आपण गरबडीत जेवतो, तेंव्हा आपण नीट चावतही नाही. त्यामुळे आपल्या शरीराला ते अन्न पचवण्यात मोठी अडचण येते. यासाठी नेहमी चावून अन्न खाल्ले पाहिजे.

(Desclaimer: हा मजकूर फक्त सल्ल्यासह सर्वसाधारण माहिती प्रदान करतो. पात्र वैद्यकीय मतांना पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top