esakal | वयाची चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांनी कोणत्या चाचण्या कराव्या; जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

पुरुषांनी कोणत्या चाचण्या कराव्या?

वयाची चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांनी कोणत्या चाचण्या कराव्या?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : वयाच्या चाळिशीपर्यंत पुरुष कुटुंब आणि करिअर यामध्ये बस्तान बसवण्यात इतके व्यग्र असतात की अनेक आजार केव्हा विळखा घालतात हे त्यांना कळत देखील नाही. यासाठी योग्यवेळेत उपचार घेणे महत्त्वाचे आहे. अतिरिक्त ताण, खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयीमुळे अनेक आजार जडतात. आधी वयाच्या साठीमध्ये होणारे आजार ३० ते ४० या वयामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. यापैकी जास्तीत जास्त आजाराचे प्रमाण पुरुषांमध्ये असल्याचे पाहायला मिळते. मात्र, अशा पुरुषांनी चाळिशीनंतर आरोग्याची योग्य ती काळजी घेतली तर सर्वकाही सुरळीत राहण्यास मदत होते.

अनेक आजारांचे वेळेत निदान झाले तर ते पूर्णपणे बरे होतात आणि पुढील धोका टळतो. त्यासाठी वेळेत उपचार मिळणे सुद्धा गरजेचे आहे. काहींची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ उपचाराची गरजही भासत नाही. परंतु, आपल्याला आजार होऊच नये यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. त्यासाठी वयाच्या चाळिशीत पोहोचलेल्या पुरुषांनी काही तपासण्या करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तपासण्या...

टेस्टीसची तपासणी

खरं तर वयात आल्यापासूनच टेस्टीसची तपासणी करणे गरजेचे असते. त्यासंबंधी पालकांनी मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे. परंतु, दुर्दैवाने तसे घडत नाही. साधारण वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर प्रत्येक पुरुषाने टेस्टीसची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याठिकाणी एखादी गाठ किंवा सूज असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा: लग्नानंतर पूर्वाश्रमीची प्रेयसी परतली अन् गेला पत्नीचा जीव

मधुमेह

मधुमेहामुळे कोणीही अनेक समस्यांना बळी पडू शकतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार मधुमेहग्रस्त एक चतुर्थांश लोक लवकर उपचार घेत नाहीत. रोज ३० मिनिट व्यायाम आणि पाच टक्के वजन कमी केल्याने मधुमेहाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

कोलेस्टेरॉल

शरीरात साठलेला बॅड कोलेस्टेरॉल हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचे कारण मानले जाते. हृदयासंबंधी समस्या असेल आणि उच्च रक्तदाब कमी किंवा जास्त असेल तर कोलेस्टेरॉल चाचणी करणे आवश्यक आहे. याची पहिली तपासणी वयाच्या विसाव्यावर्षी करावी.

त्वचेचे निरीक्षण

त्वचेवर कुठे तीळ आले आहेत का? याची तपासणी करणे गरजेचे आहे. तीळ आले असतील तर त्यामध्ये काही बदल झाले आहेत का? तिळाचा रंग बदललाय का? तसेच त्वचेवर कुठेतरी काळे-पांढरे डाग तर आले नाही ना हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

टेस्टिकुलर कॅन्सर

कर्करोग संशोधकांच्या मते, २० ते ३९ वयोगटातील पुरुषांमध्ये सर्वांत सामान्य रोग म्हणजे अंडकोष कर्करोग आहे. जर हा आजार वेळेतच ओळखला गेला तर सहजच बरा होतो. ही गाठ खूप लहान असते. यासाठी आपल्याला अंडकोष तपासणी करावी लागते. पुरुषांनी वर्षातून दोन किंवा तीन वेळा ही तपासणी केली पाहिजे.

बीएमआय

लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. तेव्हा ही तपासणी नक्की करावी.

हेही वाचा: वात, पित्त, कफ असे त्रिदोष; वाचा कोणते पेय ठरते योग्य

दातांची तपासणी

वाढत्या वयानुसार दात आणि हिरड्यांच्या समस्या उद्भवायला सुरुवात होते. दाताला झालेली इजा प्रचंड वेदनादायक व उपचार पद्धती वेळखाऊ असतो. त्यामुळे घरच्याघरी दातांची निगा राखणे गरजेचे आहे. दररोज दोनदा दात घासावे. महिन्यातून एकदा तरी कोणाच्या मदतीने किंवा स्वतः आरशासमोर उभे राहून हिरड्यांना कीड लागली आहे काय? हे तपासून घ्यावे. तसेच प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन काही चाचण्या कराव्यात.

एचआयव्ही

विविध संशोधनातून सिद्ध झाले की, एचआयव्हीची लागण झालेल्या ३३ टक्के लोकांना हा आजार झाल्याचे माहीत नसते. म्हणून याची तपासणी करून घ्यावी. ही एक सामान्य रक्ततपासणी आहे. या व्यतिरिक्त डॉक्टरचा सल्ला घेत इतर चाचण्यादेखील करून घ्याव्यात. पुरुषांनी दर पाच वर्षांनी तपासणी करणे आवश्यक आहे.

loading image
go to top