
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात पोटात कळा येणे ही सर्वसामान्य बाब आहे. त्यामुळे पोटात कळा यायला लागल्यावर लगेच घाबरुन जाण्याची अजिबातच गरज नाही. मात्र, या कळांचं प्रमाण जास्त असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणंच फायद्याचं ठरतं. परंतु, प्रेग्नंसीच्या काळात पोटात कळा का येतात याविषयी या लेखात आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (when should you worry about abdominal pain during pregnancy)
गर्भधारणेदरम्यान पोटात कळ येण्यामागची कारणे कोणती?
१. गर्भधारणेनंतर एक किंवा दोन आठवडे पोटात कळा येऊ शकतात. एखाद्याच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये अंडी फलित झाल्यानंतर, ते गर्भाशयात प्रवेश करते. यादरम्यान सुरुवातीच्या काळात थोडेसे क्रॅम्पिंग होऊ शकते. गर्भाशयात बदल झाल्यामुळे क्रॅम्पिंग देखील होऊ शकते. पहिल्या तिमाहीत आपल्या शरीरात वेगाने बदलत होतात.
२. गर्भाची वाढ होताना गर्भाशयावर ताण आल्यास पोटात कळ येऊ शकते.
३. गर्भधारणेदरम्यान झालेल्या डिहायड्रेशनमुळे देखील क्रॅम्पिंग होऊ शकते. गर्भवती महिला खूप लवकर डिहायड्रेट होऊ शकतात.
४. ओटीपोट दुखत असेल तर त्यामुळेदेखील क्रॅम्पिंगला होऊ शकतं. गॅस होणे, सूज येणे, बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्यांमुळे देखील पोटात कळ येऊ शकते. शिवाय बद्धकोष्ठतेसारखी समस्या देखील जाणवेल.
गंभीर कारणे कोणती?
१. गर्भपात झाल्यामुळेदेखील पोटात कळ येऊ शकते. सहसा, गर्भपात झाल्यास पोटात कळ येण्याबरोबरच रक्तस्राव देखील होऊ शकतो.
२. मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय) हे देखील पोटात कळ येण्याचे कारण असू शकते.
तुम्हाला त्याव्यतिरिक्त इतर कोणती लक्षणे नसतील तर कदाचित ते चिंतेचे कारण नाही. परंतु, जर पोटात तीव्र कळ येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही महत्त्वाच्या टीप्स-
बसण्याची, झोपण्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा, गरम पाण्याने अंघोळ करा. पुरेशी विश्रांती तसेच व्यायाम करायला विसरू नका. दुखणा-या भागावर गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल किंवा गरम पाण्याची पिशवी ठेवा. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे द्रव पदार्थांचे सेवन करा.
( डॉ. राजेश्वरी पवार या पुण्यातील खराडी येथील मदरहुड हॉस्पिटलमध्ये प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ सल्लागार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.