Weight Loss साठी चपाती खावी की भात? जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर

भारतामध्ये जेव्हा वजन कमी करण्याची एखाद्यावर वेळ येते तेव्हा सगळ्यात आधी प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे डाएट करत असताना भात खाणं योग्य की चपाती
चपाती की भात काय खावे
चपाती की भात काय खावेEsakal

सध्या वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट्सचा ट्रेंड पाहायला मिळतोय. वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले अनेकजण या विविध डाएटला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. पण खास करुन भारतामध्ये जेव्हा वजन कमी करण्याची एखाद्यावर वेळ येते तेव्हा सगळ्यात आधी प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे डाएट करत असताना भात खाणं योग्य की चपाती. Which is better option for weight loss roti or rice

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक डाएट ट्रेंडमध्ये वजन कमी करण्यासाठी भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याएवजी चपातीचा आहारात समावेश करण्यास सांगितलं जातं. तर अनेक तज्ञांच्या मते भात खाल्ल्याने वजन Weight वाढत नाही. त्यामुळे भातही डाएटमध्ये Diet चालू शकतो असं सांगितलं जातं. Rice or roto what is good for weight loss

भात आणि चपाती यापैकी नक्की कुणाची निवड करावी असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अनेकजण डाएट करताना भात आणि चपाती दोन्ही खाणं बंद करतात. तर काहीजण दोन्ही खाऊनही वजन कमी करण्यात यशस्वी होतात. चपाती आणि भात खाण्याबद्दल विविध प्रश्न निर्माण होतात. यात

१. कशात कॅलरी जास्त असतात?

२. पोषक तत्व कशात अधिक आहेत?

३. काय खाऊन पोट जास्त वेळ भरलेलं राहील?

४. वेट लॉससाठी काय जास्त फायदेशीर?

५. कोणता भात खाणं जास्त चांगलं?

६. चपाती किंवा भाकरी कोणत्या पीठाची असावी?

७. भात आणि चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती?

साधारण अनेकांना हे प्रश्न निर्माण होतात. आज तुमच्या याच प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात नेमका भात खावा कि चपाती याचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल. rice or roti what is more healthy 

हे देखिल वाचा-

चपाती की भात काय खावे
Weight Loss : जिमला न जाता कसं घटवाल वजन ?

कशात कॅलरी जास्त असतात?

दोन चपात्यांमध्ये १३०-१४० इतक्या कॅलरीज असतात. तर १०० ग्रॅम म्हणजेच जवळपास अर्धा वाटी शिजलेल्या भातामध्येही १४० कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही आमटीसोबत  दोन चपात्या खात असाल किंवा मग अर्धा वाटी भात दोन्हीचा हिशोब एकच होतो. तुम्ही २ चपात्या किंवा अर्धा वाटी भात यापैकी एक पर्याय निवडू शकता.

कोणता भात खावा?

तुम्ही जेवताना कोणता भात खाताय, हे देखील महत्वाचं आहे. जर तुम्ही पातळ तांदूळ खात असाल तर तुम्हाला लवकर भूक लागू शकते. कारण पातळ तांदळात फायबरचं प्रमाण कमी असतं. जर तुम्ही एखदा जाडा तांदूळ खात असाल तर पोट जास्त वेळ भरलेलं राहील आणि लवकर भूक लागणार नाही. तसचं तुम्ही डाएट करत असाल तर ब्राऊन राईस हा एक उत्तम पर्याय आहे. 

कोणत्या पिठाची चपाती खावी?

वजन कमी कऱण्यासाठी आहारातून मैद्याचे पदार्थ व्यर्ज करणं गरजेचं आहे. यासाठी मैदाची चपाती खावू नये. यामुळे रक्तातील सारखेचं प्रमाण जलद गतीने वाढतं. तर फायबर असलेल्या पिठाची चपाती खाल्ल्याने साखरेचं प्रमाण हळूहळू वाढतं. ज्यांना ग्लूटनयुक्त पदार्थांची एलर्जी आहे त्यांनी जव किंवा बार्लीच्या चपातीचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तसचं ज्वारी किंवा नाचणीच्या भाकरीला आहारात समाविष्ट करून घ्यावं. ग्लूटनची समस्या नसेल तर मल्ट्री ग्रेन चपाती खाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. 

खाण्यासाठी योग्य वेळ

काही लोक इंटरमिटेंट फास्टिंग करतात. यात ते दुपारी एकदा आणि त्यानंतर रात्री एकदा जेवतात. तर काही सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणं भरपेट करून रात्री केवळ काही हलकं खाणं पसंत करतात. काही एकवेळ पूर्ण जेवण आणि एक वेळ फळं किंवा सलाड खातात. तुम्ही  कोणतही रुटीन फॉलो करत असाल तरी एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे तुमचं मेन मील हे दुपारी असायला हवं. दुपारी १२-२ या वेळेत आपला मेटाबॉलिक रेट हा उच्च असतो. तसचं तर तुम्हाला रोज रात्रीचं जेवण घ्यायची सवय असेल तर तुमचं जेवण हे झोपण्याच्या तीन तास आधी होईल हे सुनिश्चित करा. जेवल्यानंतर लगेचच झोपत असाल तर अन्न पचण्यास त्रास होते. शिवाय रात्रीच्या वेळी आपली पचनक्रिया ही अत्यंत मंद गतीने काम करत असते त्यामुळेच रात्रीचा आहार हलका असावा. शिवाय तो लवकर करावा. नाहीतर वजन वाढू शकते. 

रात्री भात खावू नये असा अनेकांचा समज असतो. तर काही जण रात्री चपाती खाणं टाळतात. मात्र जर तुम्ही रात्री लवकर जेवत असाल तर तुम्ही जेवणात दोन्हीचा समावेश करू शकता. जेवल्यानंतर शतपावली करा आणि तीन तासांनी झोपा. 

पोर्शन कंट्रोल महत्वाचं

तुम्ही जेवणात भात किंवा चपाती किती प्रमाणात खाताय हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्लेट भरून भात खात असाल तर ते जवळपास ५-७ चपात्यांएवढचं होईल. यामुळे वजन वाढू शकतं. भात किंवा चपाती खाताना ती प्रमाणात खावी. साधारण दोन मध्यम आकाराच्या चापात्या आणि अर्धा वाटी भात तुम्ही दुपारच्या जेवणात खावू शकता. यासोबत वाटीभर डाळ किंवा आमटी तसचं एखादी भाजी आणि सलाड घ्यावं. जर तुम्हाला भात जास्त खायचा असेल तर एक चपाती आणि एक वाटी भात तुम्ही खावू शकता. फक्त लक्षात घ्या तांदूळ किंवा तुमच्या चपातीच्या पिठात फायबरच प्रमाण जास्त असेल याची काळजी घ्या. फायबरमुळे आपल्या पोटात चांगले प्रोबायोटिक्स तसचं बॅक्टेरिया तयार होतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com