
तुम्ही अनेकांना अचानक बेशुद्ध होताना पाहिले असेलच, पण यामागे काय कारण असू शकते.
लोक अचानक बेशुद्ध का होतात? जाणून घ्या चार कारणे
तुम्ही कधी विचार केला आहे का की, काही लोक अचानक बेशुद्ध (Unconscious) होतात, त्यामागील कारणे काय असू शकतात? आपण आपल्या आजुबाजूला अनेकदा पाहतो की, जी व्यक्ती पूर्णपणे तंदुरुस्त (Fit) आणि निरोगी (Healthy) दिसत आहे, परंतु अचानक कोणत्याही कारणाशिवाय त्या व्यक्तीला चक्कर येऊ लागते.
अचानक बेशुद्ध होण्याची कारणे...
मेंदूतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे येणारी चक्कर, पूर्णपणे बेशुद्धीमुळे होत नसली, तरी त्यासाठी काही घटक कारणीभूत असल्याचे मानले जाते. ते जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे जेणेकरून भविष्यातील अडचणी टाळता येतील.
हेही वाचा: हिवाळ्यात डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात समावेश करा 'या' 5 फूडचा
लो ब्लडप्रेशर:
बेशुद्ध होण्याचे मुख्य कारण म्हणजे लो ब्लडप्रेशर (Low blood pressure) असल्याचे सांगितले जाते. हे विशेषतः 65 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी अधिक आहे.
डिहाइड्रेशन:
जेव्हा तुमचे शरीर डिहाइड्रेशन (Dehydration) होते, तेव्हा तुमच्या रक्तातील द्रवाचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे बेशुद्ध होण्याचा धोका वाढतो.
हेही वाचा: आलेपाक खा, निरोगी राहा! जाणून घ्या १० फायदे
डायबिटीज:
जर तुम्ही डायबिटीजचे (Diabetes) रुग्ण असाल तर बेशुद्ध होण्याची शक्यता जास्त असते. कारण जर तुम्ही डायबेटिक असेल तर तुम्हाला युरिनचा जास्त त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा धोका होऊ शकतो.
हृदयरोग:
हृदयरोग हे देखील बेशुद्ध होण्याचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते, कारण जेव्हा असे होते तेव्हा तुमच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा प्रभावित होतो. वैद्यकीय परिभाषेत अशा प्रकारच्या बेशुद्धला कार्डियाक सिंकोप म्हणतात.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Web Title: Why Do Some People Suddenly Become Unconscious Here Are Four Reasons
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..