esakal | महिलांना गर्भपातानंतर का होतो मानसिक त्रास? वाचा सविस्तर

बोलून बातमी शोधा

mental challenge
महिलांना गर्भपातानंतर का होतो मानसिक त्रास? वाचा सविस्तर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : गर्भपाताचे भाविनक दुष्परिणाम होतात. गर्भपात करण्याचा निर्णय एखाद्याच महिलेसाठी सोपा असू शकतो. नाहीतर गर्भपात करणे ही काही सोप्पी गोष्ट नाही. हा काळ आयुष्यातील अतिशय तणावपूर्ण काळ असू शकतो आणि गर्भपात केल्यानंतर मिश्रित भावना येऊ शकतात. मात्र, याबाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो.

गर्भपाताचे भावनिक परिणाम -

गर्भपात केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात. मात्र, यामध्ये नकारात्मक भावना सर्वसमावेश आहे. हार्मोनल बदलांमुळे अशा भावना निर्माण होतात. स्वतःला दोषी समजणे, राग, लाज वाटणे, पश्चाताप वाटणे अशा भिन्न स्वरुपाच्या भावना उफाळून येऊ शकतात.

हेही वाचा: बाळांना कोरोनाचा धोका असतो का? वाचा काय सांगतात डॉ. देशमुख

गर्भपात केल्यानंतर जागृत होणाऱ्या भावना -

  • स्वाभिमान किंवा आत्मविश्वास कमी होणे

  • एकाकीपणाची भावना

  • झोपेची समस्या आणि स्वप्नांसंबंधित समस्या

  • आत्महत्या किंवा आत्महत्येचे विचार

  • वास्तविकतेचा सामना करताना समस्या उद्भवणे

धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बंधनांमुळे विजय मिळवणे अधिक कठीण होते, खासकरुन एखाद्याला काय झाले ते सांगायला शब्द नसले तर हा काळ खूप कठीण जातो. बर्‍याच घटनांमध्ये वेळोवेळी या नकारात्मक भावना कमी होतात. परंतु, जर भावनिक आणि मानसिक त्रास कायम राहिला आणि नैराश्याची लक्षणे दिसली तर एखाद्या व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा: 'मी माझं आयुष्य जगलो', ८५ वर्षीय आजोबाने दिला तरुणाला बेड अन् स्वतः पत्करले मरण

गर्भपात झाल्यानंतर कोणत्या लोकांना जास्त नैराश्य येते?

ज्या स्त्रिया अधिक नकारात्मक विचार आणि मानसिक तणावात असतात.

ज्या स्त्रिया भावनात्मक किंवा मानसिक चिंतेत असतात.

ज्या स्त्रियांना सक्ती केली गेली आहे किंवा गर्भपात करण्यास भाग पाडले गेले आहे अशा महिला

ज्या स्त्रिया धार्मिक श्रद्धांच्या आधारे गर्भपात चुकीचा मानतात

ज्या महिलांचे नैतिक विचार गर्भपात विरोधात आहेत

गर्भधारणेनंतरच्या अवस्थेत ज्या महिलांनी गर्भपात केला आहे

ज्या स्त्रिया भागीदारशिवाय गर्भपात करतात.

ज्या स्त्रिया जनुकीय किंवा गर्भाच्या असमानतेमुळे गर्भपात करतात

ज्या स्त्रियांमध्ये अनुवांशिक कमतरता किंवा मानसिक आजार आहेत

ज्या स्त्रिया यापूर्वी नैराश्य आणि चिंताग्रस्त समस्या आहेत

ज्या महिलांना जोडीदार मिळत नाही.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)