women health : स्त्रियांसाठी 'या' आहेत बेस्ट प्रोटीन पावडर

'या' प्रोटीन पावडरमुळे वजन कमी होण्यासोबतच स्नायूदेखील बळकट होतात
Milk-Powder
Milk-Powder

सध्याच्या काळात स्त्रियादेखील पुरुषांप्रमाणे प्रोटीन पावडरचं सेवन करुन स्वत:ला फीट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रोटीन पावडर सेवन करण्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळे अनेक स्त्रिया प्रोटीन शेक किंवा प्रोटीन पावडर घेण्यास घाबरतात. परंतु, या पावडरमुळे स्नायू बळकट होण्यासोबतच शरीरातील अतिरिक्त चरबीदेखील कमी होण्यास मदत मिळते. म्हणूनच, स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेस्ट प्रोटीन पावडर कोणत्या ते पाहुयात. (womens health best protein powders for women)

१. वे-प्रोटीन-

वे प्रोटीन पावडर ही मिल्क डिराइव्ड प्रोटीनचा मुख्य स्त्रोत मानली जाते. यामुळे स्त्रियांचं वजन नियंत्रणात राहतं व स्नायू बळकट होतात. तसंच स्त्रियांची शारीरिक ऊर्जा वाढते. ज्यामुळे थकवा, मरगळ, अशक्तपणा या समस्या दूर होतात. परंतु वे-प्रोटीन हे दूधापासून तयार केलं जातं. त्यामुळे ज्या स्त्रियांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी आहे अशा स्त्रियांनी हे प्रोटीन घेऊ नये.

२. एग-व्हाइट प्रोटीन -

प्रोटीनचा महत्त्वपूर्ण स्त्रोत म्हणजे अंडी. सध्याच्या काळात एग-व्हाइट प्रोटीन पावडर ही लोकप्रिय सप्लिमेंट असल्याचं सांगण्यात येतं. खासकरुन अॅथलेटिक्ससाठी ही सप्लिमेंट फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. एग-व्हाइट प्रोटीनमधून ब्रँडेड-चेन अमिनो अॅसिड मिळतं. ज्यामुळे स्नायू बळकट होतात.

Milk-Powder
प्रेग्नंसी टेस्ट किती प्रकारच्या असतात माहितीये?

३. हेम्प प्रोटीन-

हेम्प प्रोटीन हे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे. यात ओमेगा-२ आणि ओमेटा-६ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे शरीरावर आलेली सूज, लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतं. तसंच हृदय रोगसारखी समस्याही दूर होते.

४. ब्राऊन राईस प्रोटीन-

वेगन फ्रेंडली लोकांसाठी ब्राऊन राईस प्रोटीन बेस्ट पर्याय आहे. यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता भरुन निघते. तसंच एक्सरसाईज करताना स्टॅमिनादेखील वाढतो.

५. कोलेजन -

कोलेजन ही एक नवीन प्रोटीन पावडर आहे. ज्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता भरुन काढण्यासोबतच सांधेदुखी, त्वचेसंबंधीत तक्रारी दूर होतात. तसंच स्नायू मजबूत होतात. साधारणपणे एक्सरसाईज, वॉकिंग करताना होणारी सांधेदुखीची समस्या या कोलेजनमुळे कमी होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com