
मुंबई : मूत्रपिंडातील खडे ही बर्याच लोकांमध्ये सामान्यतः उद्भवणारी समस्या आहे, यामुळे मूत्रपिंडाचा तीव्र रोग होऊ शकतो आणि शेवटी मूत्रपिंड निकामी होऊ शकते. भविष्यात मूत्रपिंडाच्या समस्या टाळण्यासाठी आपल्या द्रवपदार्थाचे सेवन करणे, संतुलित आहाराचे पालन करणे, योग्य प्रमाणात कॅल्शियम घेणे तसेच नियमित तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे. एकुण लोकसंख्येपैकी 12 टक्के नागरिक मूतखड्याच्या विकाराने त्रस्त आहेत. तर मुतखड्यासारख्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्याने 50 टक्के व्यक्तींना किडनी फेल्युअर सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
आपल्या मूत्रपिंडाचे मुख्य कार्य म्हणजे मूत्र तयार करण्यासाठी रक्तातील कचरा आणि द्रव बाहेर टाकणे. परंतु, अशा बर्याच समस्या आहेत ज्या आपल्या मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. पुरेसे पाणी न पिणे, लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास, काही औषधे, पॉलीसिस्टिक मूत्रपिंडाचा रोग, आणि यूरिक एसिड आणि कॅल्शियमची उच्च पातळी आदी कारणांमुळे मूत्रपिंडात खडे तयार होऊ शकतात.
मूतखड्यामुळे मूत्रपिंडावर दाब आला असेल, तर मूत्रपिंड कायमचे निकामी होऊ शकते. मूतखड्याची लक्षणे ही खडा कोठे आहे यावर अवलंबून असतात. क्ष-किरण तपासणीत (साधा क्ष-किरण फोटो वा शिरेतून विशिष्ट रंग शरीरात टोचून काढलेले मूत्रपिंडाचे फोटो ) मूतखड्याचे निदान होऊ शकते. खड्याचा प्रकार व जागा यावरून भरपूर पाणी पिऊन तो पाडायचा प्रयत्न करणे. शस्त्रक्रिया करून काढून टाकणे, ध्वनिलहरींचा वापर करून खडा फोडून मूत्रमार्गे त्याचे कण बाहेर टाकणे, आदी उपाय करता येतात.
मूत्रमार्गातील वेदनाला लसर लघवी, मळमळ, उलट्या आणि वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा अशी लक्षणे आढळल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूत्रपिंडातील खड्यांकडे दुर्लक्ष केल्यास तसेच उपचारास विलंब केला तर मूत्रपिंडाचे विविध आजार बळावण्याची शक्यता वाढू शकते. आपले मूत्रपिंड कार्य करणे थांबवू शकते आणि नंतर यामुळे एंड-स्टेज रेनल डिसीज (ईएसआरडी) होऊ शकतो ज्याला मूत्रपिंड निकामी होणे देखील म्हणतात.
"मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे त्रस्त नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. जर योग्य वेळी उपचार केले गेले नाहीत तर 50 टक्के लोकांना नंतरच्या आयुष्यात काही प्रमाणात मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या उद्भवू शकते.
एकूण लोकसंख्येपैकी 12 टक्के लोक मुतखड्याच्या समस्येने ग्रस्त आहेत आणि ही देखील चिंतेची बाब आहे. उपचारपध्दती देखील व्यक्तीनुसार भिन्न असू शकते. एखाद्याला वैद्यकीय व्यवस्थापन किंवा एन्डोस्कोपिक प्रक्रिया करण्यास सूचित केले जाऊ शकते जसे की लेझर किंवा इंडोस्कोप शस्त्रक्रिया.
काही रुग्णांना मुतखड्यावरील उपचाराकरिता एक दिवसीय वेदनाविरहीत प्रक्रिया करून घेण्यास सुचविले जाते. या एक दिवसीय प्रक्रियेनंतर रुग्ण लगेचच आपल्या दैनंदिन कामांना सुरुवात देखील करू शकतो."
- डॉ तरुण जैन, यूरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा
आपल्या तज्ञांचा सल्ला घेऊन पुरेसे द्रव पदार्थांचे सेवन करा. साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या द्रवपदार्थांचे सेवन करणे टाळा. दररोज व्यायाम करा, आहारात मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि किडनी स्टोन सारख्या समस्या रोखण्यासाठी प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन टाळा. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये आणि तृणधान्याचे आहारात समावेश करा. आपल्या शरीरातील कॅल्शियमच्या पातळीचे निरीक्षण करा. मूत्रपिंड निकामी होऊ नये म्हणून किडनी स्टोन असलेल्यांनी नियमित तपासणीसाठी जावे. वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या असेही डॉ. जैन सांगतात.
\world kidney day twelve percent of the people are suffering from kidney stone problem
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.