esakal | Corona च्या संकटजन्य वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेले 7 आयुर्वेदिक उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

ayurvedic remedies

भारत सरकारनेही आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून (Ayurvedic Remedies) खास सूचना दिल्याचे पाहायला मिळाले. आयुर्वेदिक उपचाराने केवळ कोरोनाचे संकटाची भीती कमी झाली नाही तर अन्य रोगापासूनही संरक्षण मिळण्यास मदत झाली.

Corona च्या संकटजन्य वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेले 7 आयुर्वेदिक उपाय

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

भारताला आयुर्वेदाचं वरदान लाभलं आहे. आयुर्वेदामध्ये रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याची क्षमता आहे. हजारो वर्षांपासून देशात याचा उपयोग केला जातो. 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या (CoronaVirus)प्रादुर्भावाच्या काळात बऱ्याच लोकांनी आयुर्वेदिक उपायावर भर दिला. भारत सरकारनेही आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून (Ayurvedic Remedies) खास सूचना दिल्याचे पाहायला मिळाले. आयुर्वेदिक उपचाराने केवळ कोरोनाचे संकटाची भीती कमी झाली नाही तर अन्य रोगापासूनही संरक्षण मिळण्यास मदत झाली. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात  रोग प्रतिकारक क्षमता (Immunity)वाढवण्यासाठी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेले आयुर्वेदिक उपाय.... 
 
1. रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी काढा कसा बनवायचा? 

ऋतू बदलामुळे उद्धभवणाऱ्या आजारासह अन्य छोट्या-छोट्या आजारादरम्यान काढा उपयुक्त मानला जातो. प्रत्येक आजारासाठी वापरला जाणारा काढा हा वेगवेगळा असतो. यात अनेक अँटीऑक्सीडेंट गुण असतात. ज्यामुळे अँटी-फ्लू, खोकला आणि ऋतूबदलामुळे निर्माण होणारे वायरसला थोपवणे शक्य होते. काढा तयार करण्यासाठी लवंग, दालचीनी,आल्हे इत्यादीचा मिश्रणाचा वापर केला जातो.  जवळपास 40 औषधी वनस्पतींपासून बनवण्यात येणारे ‘च्यवनप्राश’ हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीचे सर्वात उपयुक्त रसायन मानले जाते. 

​2 . केस गळणे आणि केसावनस्पतींपासूनत कोंडा टाळण्यासाठी काय करावे? 

केसात होणारा कोंडा आणि केस गळण्यासंबंधीच्या समस्यावरचे उपाय देखील इंटरनेटवर सर्वाधित सर्च करण्यात आले आहे. केस स्वच्छ ठेवणे त्याची योग्य निगा राखणे हा यावरचा सर्वात प्रथम उपचार आहे. याशिवाय औषधी तयार करण्यात येणारे तेल यावर उपयुक्त ठरु शकतात.   


हृदय रुग्णांनो, थंडीत आरोग्य सांभाळा! रक्तप्रवाहात अडथळ्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा


​3 . आयुर्वेदिक बेस्ट इम्युनिटी बूस्टर?

आवळ्यात अनेक गुण आहेत. उत्तम पित्तशामक,लघवी साफ करणे, अंगाची-पोटाची-लघवीची जळजळ कमी करणे, आम्लपित्त, चक्कर, धातुदोर्बल्य, स्त्रियांचे पाळीचे विकार, शरीरातील फाजील उष्णता (कडकी), पोट साफ न होणे, आतडय़ांचे विकार, मधुमेह, हृदयविकार अशा अनेक प्रकारच्या आजारावर आवळा रामबाण ठरतो.  

4 पित्तावरील आयुर्वेदिक उपाय कोणते? 

पित्त ही सर्वसामान्य समस्या आहे. हे दुखणं कधी-कधी गंभीर रुपही घेऊ शकतं. पोट दुखी, जळजळ यासाठी अनेकदा पित्ताच्या गोळ्या घेतल्या जातात. पण असे न करता आयुर्वेदिक उपाय अधिक फायदेशीर ठरु शकतो. त्यामुळेच इंटरनेटवर  यासंदर्भात अधिक सर्च झाल्याचे पाहायला मिळते.  

हिवाळ्यात आजाराने बेजार व्हायचे नसेल तर हे पाच पदार्थ खाणे टाळा 

5. सांधे- गुडघे दुखीवरील आयुर्वेदिक उपचार  

 अपघातामध्ये झालेली इजा किंवा गुडघ्याच्या सांध्याच्या अतिशय वापरामुळेही गुडघे दुखण्याचा त्रास होऊ शकतो. सांधे दुखणे, सांध्यांची हालचाल योग्य रितीने न होणे, तसेच चालताना, वाकताना, उठताना, बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरताना होणाऱ्या वेदना यासाठी आयुर्वेदात अनेक चांगले आणि उपयुक्त उपाय सांगितले आहेत. त्यामुळे यासंदर्भातही अधिक सर्च झाल्याचे दिसते.   

 6 . रक्तदाबावरील आयुर्वेदिक उपचार 

रक्तदाबाच्या समस्याने त्रस असणाऱ्यांना देखील आयुर्वेदात काही खास उपाय सांगितले आहेत. पित्त आणि वातीचा प्रकार याच्या असंतुलनामुळे रक्तदाबाची समस्या उद्धभवल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. गाजर, पालक यासारख्या फळ आणि पालेभाज्यांच्या सेवनातून रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.  

7 . त्वचेवरील पिंपल्ससारख्या समस्यावरील आयुर्वेदिक उपचार

त्वचा तजेलदार आणि टवटवीत असावी हे सर्वांनाच वाटते. त्यासाठी अनेकजण काहीही उपाय करायला तयार असतात. बाजारात अनेक क्रिम मिळतात. पण अनेकदा त्याचा दुष्परिणामही अनुभवायला मिळतो. त्यापेक्षा आयुर्वेदिक उपचार कित्येकपटीनं चांगले ठरतात. त्यामुळे यासंदर्भातही इंटरनेटवर सर्वाधिक सर्च पाहायला मिळतो. 

loading image