Protein Supplements: बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट खाताय? 36 मोठ्या ब्रँड्सचे प्रॉडक्ट आहेत धोकादायक; सर्व्हेमध्ये बाब उघड

Protein Supplements: प्रोटीन हा आपल्या शरीरासाठी लागणारा मूलभूत घटक आहे. हे प्रत्येक पेशीमध्ये असते आणि शरीरासाठी सर्व प्रकारची कार्ये करते. प्रोटीन वाढवण्यासाठी लोक अनेकदा प्रोटीन सप्लिमेंट्सची मदत घेतात, पण एका संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे.
Protein Supplements
Protein SupplementsEsakal

Protein Supplements: शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी लोक प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात, पण तुम्ही घेत असलेले प्रोटीन सप्लिमेंट्स तुम्हाला आणखी धोके निर्माण करत असतील तर?, मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, प्रोटीन सप्लिमेंटमध्ये इतके विषारी पदार्थ असतात की, जर तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळाली तर तुम्हाला हे जाणून धक्का बसेल.

संशोधनात भारतात उपलब्ध असलेल्या ३६ प्रोटीन सप्लिमेंट्सची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली ज्यामध्ये अनेक प्रकारचे विष, कीटकनाशके आणि जड धातू आढळून आले. त्यातही शिसे, आर्सेनिक आणि क्रोमियमसारखे घातक घटक आढळून आले.

36 प्रोटीन सप्लिमेंट्सची लॅब टेस्ट

या संशोधनानुसार, भारतातील प्रोटीन सप्लिमेंट मार्केटमध्ये त्याच्या गोळ्या, शेक आणि पावडर उपलब्ध आहेत. त्यापैकी 36 प्रमुख उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. यामध्ये बहुतांश हर्बल उत्पादनांचा समावेश होता. प्रोटीन शेक किंवा पेयांमध्ये विशेषतः हानिकारक रसायने आढळून आली. या उत्पादनांच्या लेबलांमधील सामग्रीबद्दल जे लिहिले आहे त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या प्रोटीन शेकमध्ये बुरशीजन्य विष, कीटकनाशके आणि जड धातू असतात ज्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता आहे.

Protein Supplements
Weight Loss Tips For Summer: झोपेचा आणि वजनाचा काय आहे संबंध? उन्हाळ्यात वेट लॉस करण्यासाठी सोप्या टिप्स

संशोधनात असे म्हटले आहे की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रोटीन सप्लिमेंट्सच्या बहुतांश प्रकारांमध्ये प्रथिने फारच कमी असतात. हे प्रथिने पूरक बुरशीजन्य विष, कीटकनाशकांचे अवशेष आणि जड धातूंनी बनलेले आहेत. त्यामध्ये शिसे आणि आर्सेनिकसारखे घातक घटक आढळून आले आहेत. जे कर्करोगासाठी जबाबदार मानले जातात. भारतातील बहुतेक हर्बल प्रोटीन सप्लिमेंट्स खराब आणि कमी दर्जाचे आहेत.

Protein Supplements
Side Effects Of Sitting Long Time: जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यास होऊ शकतात 'हे' आजार

हे होऊ शकतात आजार

यकृताचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. सिरीयक अबे फिलिप यांनी हा अभ्यास करण्यात मोठा हातभार लावला आहे. बाजारात मिळणाऱ्या निकृष्ट औषधांबाबत ते अनेकदा लोकांना सावध करतात. या प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर केल्याने केवळ प्रथिने मिळत नाहीत, तर त्याशिवाय शरीराला अनेक प्रकारचे आजार होतात.

Protein Supplements
Health Care : मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी

संशोधनात असे म्हटले आहे की, या प्रोटीन सप्लिमेंट्समध्ये आढळणारे सर्व धोकादायक घटक अनेक आजारांसाठी जबाबदार आहेत. यकृताला सर्वात आधी हे नुकसान करतात. यामुळे, ते चयापचय बिघडवते ज्यामुळे अनेक रोग होऊ शकतात. यानंतर या गोष्टींचे जास्त सेवन केल्याने कर्करोगही होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com