व्यायाम, डाएट न करता होईल वजन कमी, शास्त्रज्ञांनी शोधला नवा उपाय

रात्रीची चांगली झोप दिवसाला 500 कॅलरीजपर्यंत भूक कमी करते
sleep
sleep
Summary

रात्रीची चांगली झोप दिवसाला 500 कॅलरीजपर्यंत भूक कमी करते

वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करत असतात. अवघड व्यायाम आणि आहारामध्ये बदल करून कॅलरीज कमी करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण कोणताही व्यायाम न करता किंवा आहारामध्ये कोणताही बदल न करता जर तुमचे वजन कमी होत असेल तर? तुम्हाला असा उपाय ट्राय करायला आवडेल का? शिकागो मेडिसिन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक सोपा उपाय शोधून काढला आहे ज्याचे अनेक लोक स्वागत करतील. रात्रीची चांगली झोप घेतली तर दिवसाला ५०० कॅलरीज कमी एवढी भूक कमी होते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पुरेशी झोप घेतल्याने लाखो लोकांना नको असलेले वजन वाढण्यापासून वाचवता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

इंग्लंडमधील प्रत्येक तीन पुरुषांपैकी दोन पुरुष आणि 10 पैकी सहा महिला एकतर लठ्ठ किंवा जास्त वजनाच्या आहेत. लठ्ठपणामुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक आजाराच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते आणि ह्रदयासंबधीचे आजार, मधूमेह आणि कॅन्सर अशा मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आजाराचा यामध्ये समावेश असू शकतो.

sleep
Video : काय पोरगं हाय! 10 फुट अजगरासोबत खेळतोय २ वर्षाचा मुलगा

अभ्यासाचे लेखक डॉ एसरा तासाली यांनी सांगितले की, ''गेल्या काही वर्षांत, आम्ही आणि इतरांनी हे दाखवून दिले आहे की, झोपेमधील बदलाचा परिणाम भूक नियंत्रणावर होतो ज्यामुळे जास्त प्रमाणात आहार केला जातो आणि त्यामुळे कालांतराने वजन वाढण्याचा धोका निर्मा होऊ शकतो. जर झोप कमी झाल्यामुळे असे घडत असेल, तर आपण झोप वाढवू शकतो आणि यापैकी काही प्रतिकूल परिणाम कमी होऊ शकतात का? हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. यासाठी संशोधनामध्ये जास्त वजन असलेले आणि सहसा रात्री फक्त साडेसहा तास झोपणाऱ्या 80 तरुणांचा समावेश केला. त्यांना झोपेचे निरिक्षण (Sleep Monitor) करणारे यंत्र देण्यात आले आणि रात्री साडे-आठ तास झोपण्यासाठी काऊन्सिलिंग केले होते. सहभागी व्यक्तींच्या आहारामध्ये कोणताही बदल न करता नेहमी प्रमाणे झोपू शकत होते.

sleep
Teddy Day : प्रेम अन् टेडीचे असे आहे खास नाते

डॉ. तसाली म्हणाले की, ''लॅबमध्ये या विषयावरील बहुतेक इतर अभ्यास हे अल्पावधीच्या काळाचे होते, फक्त काही दिवसांसाठीच. सहभागींनी दिलेल्या आहारापैकी किती आहाराचे सेवन केले यावरून कॅलरीज सेवनाचे प्रमाण मोजण्यात आले होते.

आमच्या संशोधनामध्ये, आम्ही फक्त झोपेवर नियंत्रण केले. सहभागींना आहारामध्ये हवे ते खाण्याची मुभा होती. आम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्या आहाराची किंवा त्यातून मिळणाऱ्या पोषण तत्वाची नोंद ठेवली नाही. काही काऊन्सिलिंग सेशन नंतर सहभागींचा झोपण्याचा कालावधी १ तास जास्त वाढला.

फक्त कॅलरीजची नोंद ठेवण्यासाठी संशोधकांनी, 'डबल लेबल वॉटर मेथड' ही स्पेशल युरीन टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये सहभागींना देण्यात आलेल्या पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोडनचे अनु इतर घटकांसोबत बदलण्यात आले होते.

Sleep
Sleep
sleep
Promise Day 2022: जोडीदाराला काय गिफ्ट द्यायचं प्रश्न पडलाय! हे घ्या उत्तर

प्रोफेसर डेल स्कोएलर म्हणाले की, "प्रयोगशाळा नव्हे तर वास्तविक जगामध्ये दैनंदिन जीवनात खर्च होणारी ऊर्जा वस्तुनिष्ठपणे मोजण्यासाठी हे सुवर्ण मानक मानले जाते आणि यामुळे लठ्ठपणाचा अभ्यास करण्याची पद्धत बदलली आहे."

जे लोक खपू झोपतात त्यांची भूक दिवासाला सरासरी २७० कॅलरीजने तर काहींचे ५०० कॅलरीज कमी होत असल्याचे संशोधकांना आढळते. यावरून तीन वर्षामध्ये १२ किलो वजन कमी होते आणि हे परिणाम दिर्घकाळ टिकून राहतात.

डॉ. तसाली म्हणाले की, झोपेविषयीच्या एका काऊन्सिलिंग सेशनंतर आम्ही पाहिले की, सहभागींच्या झोपण्याच्या सवयी बदलल्या ज्यामुळे त्यांच्या झोपण्याच्या कालवधीमध्ये वाढ झाली आहे.

"आम्ही प्रत्येक व्यक्तीला चांगल्या झोपताना स्वच्छतेची काळजी प्रशिक्षण दिले. आम्ही त्यांच्या स्वतःच्या झोपेच्या वातावरणाबद्दल चर्चा केली आणि त्यांच्या झोपेचा कालावधी सुधारण्यासाठी ते करू शकतील असे बदल करण्याचा योग्य सल्ला दिला.

हा अभ्यास साधारण ४ आठवडे सुरू होता, त्यापैकी पहिल्या दोन आठवड्यांमध्ये सहभांगीना आंद कसा आणि किती घेता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले होते

Sleep
Sleep
sleep
LPG सिलिंडरला Expiry Date असते का? सुरक्षेची अशी घ्या काळजी

डॉ तासाली म्हणाले: “ हा वजन कमी करण्याचा अभ्यास नव्हता परंतु केवळ दोन आठवड्यांच्या काळामध्ये, कॅलरीजचे सेवन कमी झाले आहे. नकारात्मक उर्जा संतुलित करता आली आणि कॅलरीजचे सेवन हे शरीरामध्ये वापरल्या गेलेल्या कॅलरीजपेक्षा कमी झाल्याचे प्रमाणबद्ध पुरावे आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा मात करण्यासाठी चांगली झोप फायदेशीर ठरू शकत. जगातील सुमारे 13% लोकसंख्येसाठी प्रभावी उपाय ठरू शकतो.

डॉक्टर तसाली म्हणाले, "जर चांगल्या झोपेची सवय दीर्घकाळ टिकवून ठेवली तर, यामुळे वजन कमी होईल हे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. कित्येक लोक वजन कमी करण्याच्या हेतूने कॅलरीज सेवन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ते आता फक्त चांगली झोप घेऊनही वजन कमी करु शकतात. संशोधनाचा निष्कर्ष जामा इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com