भारतात Monkeypox ची एंट्री? केरळमध्ये संशयित रुग्ण| Monkeypox Latest Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MonkeyPox

भारतात Monkeypox ची एंट्री? केरळमध्ये संशयित रुग्ण

सध्या कोरोनाचे सावट कमी होत असताना मंकीपॉक्स या आजाराने डोकं वर काढलयं. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाचा सामना करतोय अशात नव्याने पुन्हा आलेल्या मंकीपॉक्स आजाराने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनसह युरोपीय देशांनंतर आता अमिरेकेतही याचे रुग्ण आढळले होते मात्र आता भारतातसुद्धा मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. (a person who came from UAE who have monkeypox symptoms kerala gov said)

संयुक्त अरब अमिराती या देशातून केरळात येणाऱ्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. हा व्यक्ती तीन दिवसाआधी केरळमध्ये आला. या व्यक्तीची चाचण्या केल्या असून याचे नमुणे पुणे व्हायरोलॉजी इंस्टिट्यूटमध्ये पाठविण्यात आले. (Monkeypox latest news)

हेही वाचा: लग्नाआधी प्रत्येक पुरुषाने केली पाहिजे ही टेस्ट, फॅमिली प्लॅनिंगमध्ये होईल मदत

मे महिन्याचत युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला.

मंकीपॉक्स नावाचा आजार जगभरात वेगाने पसरत आहे. या विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये कहर केला असून हा आजार माकडांसारख्या संक्रमित जीवांपासून मानवामध्ये पसरत आहे त्यामुळे या आजाराला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा: गुजरातेत पावसाचे २४ तासांत १४ बळी

मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ संसर्ग रोग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये याचा प्रथम शोध लागला होता तर मंकीपॉक्सची पहिली मानवी केस 1970 मध्ये नोंदवली गेली होती.

मंकीपॉक्स संक्रमित प्राण्याने घेतलेल्या चाव्यामुळे किंवा रक्त किंवा शरीरातील घटकांमुळे पसरते. उंदरांमुळेही हा रोग पसरत असल्याचे मानले जाते. सोबतच नीट शिजवलेले नसलेल्या संक्रमित प्राण्याचे मांस खाल्ल्यानेही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

ताप, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे ही मानवांमध्ये मंकीपॉक्सची सामान्य लक्षणे आहेत. मंकीपॉक्सचा काळ साधारणपणे 6 ते 13 दिवसांचा असतो परंतु डब्ल्यूएचओच्या (WHO) म्हणण्यानुसार तो 5 ते 21 दिवसांपर्यंतही असू शकतो.

Web Title: A Person Who Came From Uae Who Have Monkeypox Symptoms Kerala Gov Said

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top