
कॉफीप्रेमी पुरुष सतर्क रहा, या कॉफीच्या सेवनाने वाढतो Cholesterol
आजकाल सर्व वयोगटातील लोक कॉफीचे खूप शौकीन आहेत आणि निर्भयपणे ते दिवसातून 4-5 वेळा कॉफी पितात. पण ही कॉफी आपल्या शरीरासाठी कितपत योग्य आहे, याचा विचारही आपण करत नाही. तुम्हाला माहित आहे का की कॉफी जितकी फायदेशीर आहे त्यापेक्षाही जास्त हानिकारक आहे. याहून धक्कादायक म्हणजे कॉफी महिलांसाठी काही प्रमाणात फायदेशीर असली तरी पुरुषांसाठी मात्र शारिरीक समस्येचे कारण बनू शकते. नुकतीच ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे. (According to new research coffee raised mens cholesterol level more than women)
हेही वाचा: कुटुंबात कोणालाही उच्च रक्तदाब असल्यास राहा सावध ! तुमच्यावर असा होऊ शकतो परिणाम
कोणत्या प्रकारच्या कॉफीचा शरीरावर सर्वात वाईट परिणाम होतो?
नॉर्वेच्या आर्क्टिक युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून हे समोर आले आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीचा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर कसा परिणाम होतो. संशोधनानुसार, जे लोक दररोज 3 ते 5 कप एस्प्रेसो पितात त्यांच्यात कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असते. विशेष म्हणजे कॉफी प्यायल्याने पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्याचे दिसून आले. त्याच वेळी दिवसातून 6 किंवा अधिक कप फिल्टर कॉफी पिण्याने देखील स्त्रियांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याचे दिसून आली परंतु पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे
हेही वाचा: आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं? जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे
रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा
तुम्ही ज्या प्रकारची कॉफी पितात त्याप्रकारे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. याआधीच्या बहुतेक रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला होता की कॉफीचे फायदे किंवा हानी कॉफी बनवण्यावर आणि फिल्टर करण्यावर अवलंबून आहे. मात्र या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे. फिल्टर न केलेल्या फ्रेंच प्रेस किंवा एस्प्रेसोमध्ये Cafestol आणि Kahweol सारखी कंपाउंड्स आढळतात,ज्याचा शरीरातील कोलेस्ट्रॉलवर चांगला प्रभाव पडतो.
कॉफीचे फायदे आणि तोटे
जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल आणि योग्यरित्या कॉफी पित असाल तर कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर सुद्धा आहे. कमी प्रमाणात कॉफी प्यायल्याने कोणताही मोठा धोका उद्भवत नाही. कॉफीत अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते.
Web Title: According To New Research Coffee Raised Mens Cholesterol Level More Than Women
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..