Health News : 'नैसर्गिक ग्लो'साठी प्या हर्बल टी; आरोग्यासाठी होईल फायदा, पहा कसा?

हर्बल चहा तुमच्या रोजच्या रुटीन जीवनातून काढून टाकण्यापूर्वी एकदा त्याचे फायदे जाणून घ्या...
Health News
Health News

हर्बल चहाचे नाव घेतल्याबरोबर अनेकांचे तोंड कडू होते. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असणारा हर्बल चहा अनेकजण पिणे टाळतात किंवा बंद करतात. तुम्हीही असे काही करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. हर्बल चहा तुमच्या रोजच्या रुटीन जीवनातून काढून टाकण्यापूर्वी एकदा त्याचे फायदे जाणून घेणे आवश्यक आहे.

आरोग्यासोबतच हा चहा त्वचेसाठीही फायदेशीर आहे. चहाच्या पानांचे आणि औषधी वनस्पतींचे हे एक मिश्रण आहे. तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवण्याआधीच त्या दूर केल्या जातात. हिवाळ्याच्या सुरुवातीसारख्या बदलत्या ऋतूमध्ये तुम्ही रोज एक कप हर्बल चहा प्यायलाच पाहिजे, असा सल्ला आहार तज्ज्ञ देत असतात.

Health News
पाच मिनिटांत कशी मिळवाल ग्लोईंग स्किन?, पहा सोप्या टिप्स..

वृद्धत्व विरोधी गुणधर्म

चेहऱ्यावर तुम्हाला एखादी नैसर्गिक चमक हवी असेल तर तुमच्या आहारात हर्बल चहाचा समावेश करा. हर्बल चहामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे तुमचे वृद्धत्व कमी करता येऊ शकते. या चहामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

पचनक्रिया चांगली राहते

हर्बल चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, असे म्हटंल जाते. पेपरमिंट, हर्बल चहामधील घटक, भूक कमी करते आणि जास्त खाण्याची इच्छा कमी करते. चरबी कमी करण्यासोबतच ते आम्लपित्त, लठ्ठपणा आणि उलट्या होत असतील तर अशा काही आजारांना दूर करते.

तणाव कमी होतो

तणाव कमी करणे आणि निद्रानाशावर उपचार करण्याचा विचार येतो, तेव्हा तुम्ही हर्बल टी चा वापर केला पाहिजे. अनेक समस्यांवर चांगले काम करण्यासाठी हर्बल टी चा वापर होतो. निद्रानाशाचा अनुभव घेत असलेल्या अनेक लोकांसाठी झोपण्यापूर्वी हर्बल चहा पिण्याची शिफारस केली जाते.

Health News
तुमचा ऑफिस लुक परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स; आत्मविश्वासही वाढेल

अनेक रोगांपासून संरक्षण

हर्बल टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात. यातून तुम्हाला रोग आणि संसर्गाशी लढण्यास मदत करण्याची क्षमता मिळते. ते ऑक्सिडेटिव्ह तणावापासून तुमचे रक्षण करतात आणि जुनाट आजारांचा धोका कमी करतात.

शरीर डिटॉक्स

निरोगी राहण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. हर्बल टी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दररोज एक कप हर्बल चहा पिल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com