Organ Donation : मुंबईत ४१ व्या अवयवदानाची नोंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

after two years Corona 41st organ donation recorded in Mumbai health news

Organ Donation : मुंबईत ४१ व्या अवयवदानाची नोंद!

मुंबई : अवयवदान मोहिमेला कोरोनापश्चात गती येत आहे. नोव्हेंबरअखेरीस ४१ व्या अवयवदानाची नोंद झाली. चोवीस वर्षांच्या तरुणीच्या अवयवदानामुळे मुंबईने ४१ व्या अवयवदानाचा टप्पा पार केला. गेल्या वर्षी ३२ अवयवदानाची नोंद झाली होती. जसलोक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २४ वर्षांच्या तरुणीचा नुकताच मृत्यू झाला. समुपदेशनानंतर कुटुंबीयांनी मुलीचे फुप्फुस, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे दान केली. या अवयवदानामुळे चार जणांना नवे आयुष्य मिळाले आहे. २०२२ मध्ये एकूण ४१ अवयवदान झाले. डिसेंबर महिन्यात किमान पाच-सहा अवयवदानांची भर पडेल, असा विश्वास ‘झेडटीसीसी’कडून व्यक्त करण्यात येत आहे.

सार्वजनिक रुग्णालये मागे

यंदा ४० अवयवदान खासगी रुग्णालयात तर फक्त एक अवयवदान सार्वजनिक रुग्णालयात झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक रुग्णालयांनी अवयवदान मोहिमेत पुढाकार घेण्याची गरज आहे, असे रोटो-सोटो पश्चिम विभागाच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन म्हणाल्या.

असे झाले अवयवदान

२०१८ - ४७

२०१९ - ७६

२०२० - ३०

२०२१ - ३२

२०२२ - ४१