Health Benefits : प्रदूषण मुक्त श्वास घेण्यासाठी खास एअर प्युरिफायर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Benefits

Health Benefits : प्रदूषण मुक्त श्वास घेण्यासाठी खास एअर प्युरिफायर

Health Benefits : सध्याच्या वाढत्या प्रदूषणाचा फटका सगळ्यांनाच बसतो आहे; दिल्लीमध्ये तर ह्या सगळ्याच प्रमाण जास्त आहेच पण इतर मेट्रो पोलिटीयन शहरांनाही लवकरच याचा त्रास होणार आहेच. अशा स्थितीत शासन योग्य त्या गोष्टींची अंमलबजावणी करेलच पण आपणही हे प्रिकॉर्शन्स घेऊ शकतो.

हेही वाचा: Amla Health Benefits: आरोग्यासाठी आवळ्याचे फायदे

आजकाल दिल्ली आणि एनसीआरमध्ये वायू प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे आणि लोक विषारी वायनेच श्वास घेता आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेणे, डोळे आणि फुफ्फुसात जळजळ होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा: Dancing Health Benefits: रोज 30 मिनिटं मनसोक्त नाचा आणि दुखण्याला म्हणा 'अलविदा'

वायू प्रदूषण टाळण्यासाठी लोकांना खूप संघर्ष करावा लागतो. बहुतेक बाहेर जाताना मास्क घातलेले असतात, तर घरात स्वच्छ हवा मिळण्यासाठी एअर प्युरिफायर वापरत असतात. एअर प्युरिफायर बसवून लोक प्रदूषण टाळू शकतात, असा म्हणणे आहे. आता प्रश्न असा पडतो की एअर प्युरिफायरच्या वापराने प्रदूषण खरंच रोखता येईल का? बघुया यावर तज्ञ काय म्हणतात.

हेही वाचा: Health Benefits : बटाट्याची साल फेकून देताय? जाणून घ्या फायदे

एअर प्युरिफायर प्रदूषण रोखते का?

तज्ञ म्हणतात की एअर प्युरिफायर हे वातावरणातील हवा स्वच्छ करणारे उपकरण आहे, जे हवेतील धोकादायक कण आणि धूळ बाहेर काढून हवा स्वच्छ करते. ते हवा कोरडे करत नाही आणि आर्द्रता राखते. वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर आहे आणि दमा आणि इतर ऍलर्जीच्या समस्यांनी ग्रस्त असलेले लोक झोपेच्या वेळी एअर प्युरिफायर वापरू शकतात.

हेही वाचा: Health Benefits: तुळशीची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

एअर प्युरिफायर किती प्रभावी आहेत?

हे प्युरिफायरची गुणवत्ता आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असते. लहान जागेत, ते 50% पर्यंत प्रदूषण कमी करू शकते. बाजारात अनेक ब्रँडचे एअर प्युरिफायर उपलब्ध आहेत. यामध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रदूषणामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घरात एअर प्युरिफायर लावू शकता.

हेही वाचा: Amazing Benefits Of Garli: पुरुषांसाठी लसूण करतं सुपरफूडचे काम

गळ्यात एअर प्युरिफायर घालणे फायदेशीर आहे का?

तज्ञांच्या मते, काही प्युरिफायर पोर्टेबल असतात आणि ते सहजपणे गळ्यात सुद्धा घालू शकतात. तुम्ही बाहेर जाता तेव्हा प्रदूषणाची पातळी घरापेक्षा जास्त असते आणि अशा परिस्थितीत पोर्टेबल एअर प्युरिफायर काही मीटरच्या आत हवा स्वच्छ करू शकतात. दमा किंवा ऍलर्जीमुळे ग्रस्त असलेले लोक पोर्टेबल प्युरिफायर घेऊ शकतात. एअर प्युरिफायरचा कोणताही साईड इफेक्ट नसतो, त्यामुळे जर तुम्ही त्याचा वापर केलात तर तुम्हाला थोडा फायदा होईल.