तर काय?

झोपण्यासाठी अंथरुणात पडल्यावर मला असे वाटते की, मी तोल जाऊन जिन्यावरून पडलो आहे किंवा चालताना मी अडखळून पडलो आहे.
Sleep
SleepSakal

झोपण्यासाठी अंथरुणात पडल्यावर मला असे वाटते की, मी तोल जाऊन जिन्यावरून पडलो आहे किंवा चालताना मी अडखळून पडलो आहे. यानंतर झोप उडून जाते. त्यानंतर परत शांत झोप लागत नाही. डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या, पण उपयोग होत नाही. झोप व्यवस्थित न झाल्यामुळे दिवसभर अशांत वाटत राहते. काय उपाय करावा, याबद्दल मार्गदर्शन करावे.

- नीरज देशपांडे, नाशिक

उत्तर - अशा प्रकारचा त्रास होणे हे शरीरातील वातदोषाच्या असंतुलनाचे लक्षण आहे. रोज रात्री झोपताना संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल पाठीवर हलक्या हाताने खालून वर या दिशेत नक्की लावावे. तसेच संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेलाचे ४-५ थेंब टाळूवर लावण्याचा फायदा होऊ शकेल. आठवड्यातून २-३ वेळा संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल संपूर्ण शरीराला नियमितपणे लावावे. रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी तरी जेवण संपलेले असावे. तसेच झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल, टॅबलेट वगैरे साधने वापरणे टाळावे. शक्य झाल्यास झोपण्यापूर्वी नस्यसॅन तेलाचे २-३ थेंब किंवा घरचे साजूक तूप नाकात घालावे. हे सर्व करून फायदा झाला नाही तर आयुर्वेदाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपचार सुरू करता येऊ शकतात.

मी ३५ वर्षांची आहे. आठवड्यातून १-२ वेळा माझे डोके खूप दुखते, चक्कर येते आणि उलट्याही होतात. यावर उपाय सुचवावा.

- मनीषा तरडे, ठाणे

उत्तर - पित्तप्रकृतीमुळे किंवा चुकीचे खाल्ल्यामुळे पित्त वाढल्यामुळे बऱ्याच लोकांना अशा प्रकारचा त्रास होताना दिसतो. सकाळ-संध्याकाळ संतुलन पित्तशांती या २-२ गोळ्या घेणे सुरू करावे. रात्री झोपताना सॅनकूल चूर्णासारखे चूर्ण नियमित घेणे चांगले. रात्री झोपण्यापूर्वी संतुलन पादाभ्यंग घृत तळपायाला लावून काशाच्या वाटीने हलक्या हाताने तळपाय घासावे. सकाळी उठल्यावर अनाशेपोटी एक चमचा संतुलन स्पेशल गुलकंद घ्यावा. आंबवलेले पदार्थ, तिखट पदार्थ, आंबट पदार्थ आहारातून वर्ज्य करणे उत्तम. कडधान्ये मोड आणून व्यवस्थित शिजवूनच खाणे इष्ट. महिन्यातून १-२ वेळा दोन चमचे एरंडेल आल्याच्या चहाबरोबर घ्यावे. यामुळे दुसऱ्या दिवशी २-३ जुलाब झाले की काही महिन्यांनंतर अशा प्रकारचा त्रास कमी व्हायला मदत मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com