Asthma Care Tips : अस्थमाच्या रूग्णांनी काय खावं अन् काय खाऊ नये?

Asthma patient diet: अस्थमाच्या रुग्णांनी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
asthma patient diet
asthma patient dietsakal

Asthma Patient Diet Plan : अस्थमा हा श्वासाशी संबंधीत आजार आहे. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास जाणवणे किंवा दम लागणे, ही अस्थमाची प्रमुख लक्षणे आहे. हा लंग्सच्या आजारापैकी एक आजार आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही अस्थमाचा आजार राहू शकतो. अनेकदा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अस्थमाचा अटॅक येऊ शकतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या मते, हा एक मोठा असंसर्गजन्य आजार असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण याचा शिकार होतात दरवर्षी लाखो लोकांना या आजारामुळे जीव गमवावा लागलाय.

त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. (World Asthma Day : Asthma patient diet What an asthmatic patient should eat or not eat )

आज आपण स्थमाच्या रूग्णांनी काय खावं अन् काय खाऊ नये? हे जाणून घेणार आहोत.

अस्थमाच्या रुग्णांनी मध खाणे खूप फायदेशीर आहे. मध खाल्याने श्वसन नलिकेत कोणताही बॅक्टेरीया वाढत नाही आणि त्यामुळे अस्थमाच्या अटॅकचा धोका कमी होतो.

व्हिटामिन्स के (K) मध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. व्हिटामिन्स के नी संपन्न असलेली फळे खावी ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढणार.

asthma patient diet
World Asthma Day : धक्कादायक! दमा वाढल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात 92 टक्के रुग्ण

अस्थमाच्या रुग्णांनी दररोज सकाळी तुळशीची पाने खावीत. काळी मिरी, हळद, लवंग आणि वेलचीचे सेवन यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हळद घातलेलं दुधसुद्धा प्यावं तर चहामध्ये वेलची, तुळशीचे पाने घालून चहाचे सेवन करावे.

याशिवाय अस्थमाच्या रुग्णांनी मुग डाळीचे आवर्जून सेवन करणे, गरजेचे आहे.

अस्थमा असलेल्या व्यक्तींनी दिवसातून दोन वेळा मध आणि दालचीनी यांचं सेवन करावं. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण खावं. हे चाटण करण्यासाठी चिमुटभर दालचीनीची पावडर घेऊन ती मधात मिक्स करावी.

asthma patient diet
World Asthma Day 2023 : अस्थमाच्या त्रासात ही 5 योगासनं करावी, श्वास घेण्याच्या समस्येतून आराम मिळेल
  • ज्या पदार्थांमध्ये व्हिटामिन सीचं प्रमाण जास्त आहे अशा पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. यामध्ये संत्री, लिंबू, खरबूज, टरबूज, किवी आणि ब्रोकोली या फळांचं जास्तीत जास्त सेवन करा.

  • आंबवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया व मायक्रोब्सची संख्या वाढते. म्हणून आहारात आठवड्यातून एकदा इडली, डोसा, अप्पे या पदार्थांचा समावेश करावा.

  • अस्थमाच्या रुग्णांनी पालेभाज्यांचं सेवन करावं. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, लोहचे प्रमाण अधिक असतं त्यामुळे अस्थमाचा अटॅकचा धोका कमी होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com