Banana Side Effects : या 5 आजारांनी ग्रस्त असाल तर अजिबात खाऊ नका केळी, फायद्याऐवजी वाढेल त्रास...

चला तर कोणत्या प्रकारच्या व्यक्तींनी केळी खाऊ नये जाणून घेऊया
Banana Side Effects
Banana Side Effectsesakal

Banana Side Effects : बहुतेक लोकांना खायला आवडणाऱ्या फळांच्या यादीत केळी ही असतेच. केळी हे एक आरोग्यदायी आणि पौष्टिक फळ आहे. तसेच हे फळ जगभरात जास्त आवडते असून अधिक खाल्ले जाते. केळीचे आरोग्यदायी फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. मात्र केळीबाबत तुम्हाला या गोष्टीही माहिती असणे गरजेचे आहे. तेव्हा काही रूग्णांनी केळीचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. चला तर कोणत्या प्रकारच्या व्यक्तींनी केळी खाऊ नये जाणून घेऊया.

हाय ब्लड शुगर

केळीमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे उच्च रक्तातील साखरेची पातळी किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्याचे सेवन करू नये. तुम्हाला केळी खायची तीव्र इच्छा झालीच तर पिकलेली केळी खाणे टाळावीत.

किडनी

केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक असू शकते, तसेच शरीरातील अतिरिक्त पोटॅशियम बाहेर काढण्यातही त्यांना अडचण येते. अशा व्यक्तींनी केळीचे सेवन करू नये.

Banana Side Effects
Kidney Failure : किडनी फेल करू शकतात 'या' चार चुकीच्या सवयी, आजच बदला नाहीतर...

कफ

ज्या लोकांना पोट फुगण्याच्या आणि कफच्या समस्या आहेत त्यांनी केळी खाणे आवर्जून टाळावे. केळी कफची समस्या कमी करण्याऐवजी वाढवण्याचं काम करतं.

केळीची एलर्जी असलेल्या लोकांनी केळी खाणे टाळा

ज्या लोकांना केळीची एलर्जी आहे त्यांनी केळी खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. केळीने एलर्जी होणे हे तुम्हाला नॉर्मल वाटत असले तरी त्याने पित्त, सूजन, श्वास घेण्यास त्रास यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

दमा

दम्याच्या रुग्णांनीही केळी खाऊ नये, कारण त्यांची समस्या आणखी वाढू शकते. ज्या लोकांना दमा आहे, त्यांनी चुकूनही केळीचे सेवन करू नये.

Banana Side Effects
Banana Crop : अट्रावलच्या शेतकऱ्याचे केळीची खोडे कापून फेकली; यावल पोलिसांत गुन्हा

तेव्हा या पाच प्रकारच्या रूग्णांनी केळी खाणे कटाक्षाणे टाळले पाहिजे. नाहीतर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागू शकते. केळी तुमचे आवडते फळ असले ते अशा समस्या तुम्हाला असल्यास तुम्ही केळी खाणे आवर्जून टाळले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com