Health Tips: चमच्याने खायचे एथिक्स शिकता आहात का? मग आधी त्याचे नुकसान सुद्धा जाणून घ्या...

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांना चमच्याने अन्न खायला आवडते, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी बिघडते
benefits of eating food with hands in marathi
benefits of eating food with hands in marathiesakal

Health Tips: बदलत्या संस्कृतीबरोबर आपली जीवनशैलीही झपाट्याने बदलते आहे. हे एका छोट्या उदाहरणाने समजावून सांगता येईल, जसे पूर्वी लोक हाताने अन्न खात असत पण आता त्याची जागा चमच्याने घेतली आहे.

चमच्याने अन्न खाण्यात आणि हाताने अन्न खाण्यात कोणती पद्धत जास्त फायदेशीर आहे, यावरून अनेकदा वाद होतात. चमच्याने अन्न खाताना अनेकांच्या सवयींमध्ये असा बदल दिसून येतो की त्यांना हाताने अन्न खाणे शक्य होत नाही.

या देशांमध्ये लोक हाताने जेवतात

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताव्यतिरिक्त नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्येही लोक हाताने जेवण करतात. हाताने अन्न खाल्ल्याशिवाय अन्नाची चव येत नाही, अशी अनेकांची तक्रार असते.

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांना चमच्याने अन्न खायला आवडते, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी बिघडते. याशिवाय टाइप २ मधुमेहाचाही धोका असतो.

benefits of eating food with hands in marathi
Health Tips: नाश्त्याला दलिया खाण्याचे फायदे, उन्हाळ्यात हलका आहार तब्येतीला चांगला

कोणता मार्ग अधिक फायदेशीर आहे?

आयुर्वेदात आणि जुन्या भारतीय परंपरेत हाताने अन्न खाण्याचा उल्लेख आढळतो. अग्नीसाठी अंगठा, हवेसाठी तर्जनी, आकाशासाठी मधले बोट, पृथ्वीसाठी अनामिका बोट आणि पाण्यासाठी लहान बोट अशा पाच घटकांचे प्रतिनिधित्व पाच बोटे करतात, असे आयुर्वेद तज्ञ ांचे म्हणणे आहे.

असे म्हणतात की जेव्हा आपण हाताने अन्न खातो तेव्हा आपण जास्त अन्न खाऊ नये म्हणून नियंत्रित प्रमाणात खातो. असे केल्याने आपण अतिखाणे टाळतो.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताव्यतिरिक्त नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्येही लोक हाताने जेवण करतात.

हाताने अन्न खाल्ल्याशिवाय अन्नाची चव येत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांना चमच्याने अन्न खायला आवडते, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी बिघडते. याशिवाय टाइप २ मधुमेहाचाही धोका असतो.

benefits of eating food with hands in marathi
Health tips: ‘या’ पदार्थांमध्ये दुधापेक्षा जास्त असते कॅल्शियम, आरोग्यासाठी खूप फायदेशीर

– जेव्हा आपण हाताने जेवतो, तेव्हा बोटं आणि हातांच्या पेशींचा व्यायामही होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. हाताने जेवण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे, मात्र आजच पिढी हे विसरत आहे. पण आजही काही लोकं हातानेच जेवणं पसंत करतात, त्यांना त्यामुळे बरं वाटतं.

– आयुर्वेदानुसार, असे मानले जाते की बोटांच्या टोकांमध्ये असलेल्या (fingertips) मज्जातंतूचा अंतिम भाग हा पचनास प्रोत्साहन देतो. खरंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या हातांनी खाता, तेव्हा अन्नाचा पोत, चव आणि सुगंध याविषयी अधिक माहिती असते.

– हाताने खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते. यामुळे बोटांच्या आणि हातांच्या स्नायूंचाही व्यायाम होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तुम्ही तुमच्या हातांची हालचाल जितकी अधिक सुरळीत ठेवाल तितका रक्तप्रवाह सुरळीत राहील.

पोळीचा तुकडा तोडून भाजीसोबत खाणे किंवा भात, भाजी, आमटी एकत्र कालवून आपण खातो तेव्हा बोटांची हाडे आणि सांधेही व्यवस्थित काम करतात.

– एका अभ्यासानुसार, जेव्हा लोक पेपर वाचताना किंवा टीव्ही पाहताना हाताने खातात तेव्हा त्यांना स्नॅकच्या वेळी लागणारी भूक कमी लागते आणि व ते हलका नाश्ता निवडतात. संशोधकांच्या निष्कर्षानुसार, काटा-चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाल्ल्याने परिपूर्णता आणि तृप्ततेची भावना वाढते.

benefits of eating food with hands in marathi
Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी हे 3 पदार्थ खाणे टाळा, बिघडू शकते तब्येत

– एका अभ्यासानुसार, लोक चमच्याने आणि काट्याने पटापट किंवा जलद वेगाने खातात, जे शरीरातील रक्त-शर्करा असंतुलनाशी जोडलेले आहे. यामुळे टाईप-2 मधुमेह होण्याची शक्यता आणखी वाढू शकते, त्यामुळे चमच्याने खाण्याची सवय सोडा आणि हाताने खा.

– चमच्याने जेवल्यावर जेवण किती गरम आहे हे कळत नाही आणि तोंड भाजू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या हातांनी जेवता तेव्हा तुम्हाला अन्न किती गरम आहे हे समजू शकते व गरजेनुसार अन्न गार करून खाता येते.

– चमच्याने खाण्याच्या तुलनेत स्वत:च्या हाताने जेवताना आपण हळू खातो. हाताने खाताना आपण किती अन्न खाल्लंय आणि किती बाकी आहे याचाही अंदाज येतो. जास्त खाणे हे वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अन्नाचे व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते.

– हात स्वच्छ धुवून जेवतो, त्यामुळे वैयक्तिक स्वच्छताही पाळली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com